सध्या अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेबसिरीजची चर्चा प्रचंड होत आहे. ही वेबसिरीज 20 मे रोजी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ वर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेबसिरीजमध्ये प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित बोल्ड भूमिकेत दिसल्या आहेत.
या वेबसिरिजमध्ये प्राजक्ता माळीने महत्वाची भूमिका साकारली आहे. सत्य घटनांवर आधारित असलेल्या या वेब सिरीजमध्ये प्राजक्ता माळीला तेजस्विनी पंडित साथ देताना दिसून येत आहे. या सिरीजमध्ये दोघींनीही अतिशय बोल्ड सीन्स दिले आहे. यावरुन अनेकांनी त्यांना ट्रोल देखील केलं आहे.
तसेच आता ८ भागांच्या या वेबसिरीजपैकी ६ भाग रिलीज झाले आहेत. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि तेजस्विनी पंडित यांचा रानबाजार या वेबसीरीजा टीझर रिलीज झाला होता. त्यात प्राजक्ता माळीचा बोल्ड लूक पाहून प्रेक्षकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.
अशातच प्राजक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्राजक्ताने तिच्या करिअरमधल्या बेस्ट सीन्स विषयी सांगितले आहे. प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टने सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घातला आहे.
वाचा काय म्हंटलं आहे तिने पोस्टमध्ये..? रानबाजारमधील फोट शेअर करत प्राजक्ताने लिहिले, ‘आणि जो scene माझ्या कारर्किदीतला one of the best scene आहे (अस फक्त मला नाही, अनेक जणांना वाटतय..) तो scene असलेला episode काल प्रदर्शित झाला… प्राजक्ताची पोस्ट व्हायरल होत आहे.
दरम्यान, शिवाय रानबाजार चे एकूण 8 भाग आलेत, फक्त 2 राहिल्याची कल्पना देखील प्रेक्षकांना दिली आहे. या वेब सीरिजमध्ये डॉ. मोहन आगाशे, मोहन जोशी, सचिन खेडेकर, अनंत जोग, जयंत सावरकर, मकरंद अनासपूरे, वैभव मांगले, माधुरी पवार, उर्मिला कानेटकर, सुरेखा कुडची, जयवंत वाडकर, नम्रता गायकवाड, अशी तगडी स्टारकास्ट आहे.