अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून तर घेतच असते. त्यासोबत ती आपल्या वेगवेगळ्या फोटोद्वारे रसिकांना मोहितही करत असते. ती नेहमी तिचे एकापेक्षा एक सर्रस फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत असते. चाहतेही तिच्या या फोटोंवर घायाळ होत असतात. नुकतीच प्राजक्ताने तिचे असेच काही लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. या फोटोंत प्राजक्ताचा गुलाबी अंदाज पाहून चाहते तिच्यावर फिदा झाले आहेत.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर हे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती गुलाबी रंगाचा लाँग ड्रेस घातलेली दिसून येत आहे. यावर तिने ग्रीन स्टोन असलेले झुमके घातले असून चेहऱ्यावर हलकासा मेकअप केला आहे. या फोटोत प्राजक्ता जास्त ज्वेलरी घातलेली दिसत नसली तरी तिच्या चेहऱ्यावरील गोड हास्यच साजशृंगारापेक्षा काही कमी नाही, असेच म्हणावे लागेल.
गुलाबी ड्रेसमध्ये प्राजक्ताने (Prajakta Mali) बबली फोटोशूट केला आहे. या फोटोसोबत तिने हिंदीतील एका रोमँटिक गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत. तिने लिहिले की, ‘जान-ए-जा दिलों पे प्यार का… अजब सा असर हो रहा है..! जो हाल दिला का इधर हो रहा.. वो हाल दिल का…’ यासोबत तिने #गुलाबी #oneofthefavouritesong असे हॅशटॅग वापरले आहेत.
प्राजक्ताचा(Prajakta Mali) हा गुलाबी अंदाज पाहून चाहते मात्र तिच्यावर फिदा झाले आहेत. तिच्या या फोटोवर अनेक कमेंट करत चाहते तिचे भरभरून कौतुक करत आहेत. दरम्यान प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. याद्वारे ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सोबतच ती नेहमी वर्कआऊट्सच्या टीप्स, योगासनाचे महत्त्व सांगताना दिसून येते.
प्राजक्ताने (Prajakta Mali) २००७ मध्ये आलेल्या ‘तांदळा एक मुखवटा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २०११ मध्ये ‘क्या मस्ती क्या धूम’ या रियॅलिटी शोमधून प्राजक्ताने टीव्हीवरील प्रवासाची सुरुवात केली. या ‘शो’चे तिने विजेतेपदही पटकावले होते. २०१३ मध्ये आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेद्वारे प्राजक्ता घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे.
अभिनयासोबतच प्राजक्ताला नृत्याचीही खूप आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. आपल्या नृत्याची आवड जोपासत तिने झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यात तिने तिच्या नृत्याच्या अविष्काराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. अभिनय, सौंदर्य आणि नृत्य याशिवाय प्राजक्ता एक उत्तम निवेदिकासुद्धा आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्राजक्ता माळी सांभाळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
बॉलिवूडवर शोककळा! सदाबहार गाणी लिहीणाऱ्या गीतकाराचे मेंदूतील रक्त गोठल्यामुळे निधन
VIDEO: लोकांना एप्रिल फुल करणं पडलं महागात; अंशुमनची पत्नी विनंती करत म्हणाली, ‘हे सगळं थांबवा’
Prajakta Mali : पंढरपूरची प्राजक्ता माळी कशी झाली मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री? वाचा प्रेरणादायी प्रवास