मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकून तर घेतच असते त्यासोबत ती आपल्या वेगवेगळ्या फोटोद्वारे रसिकांना मोहितही करत असते. ती नेहमी तिचे एकापेक्षा एक सर्रस फोटो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांशी शेअर करत असते. चाहतेही तिच्या या फोटोंवर फीदा होत असतात. नुकतीच प्राजक्ताने तिचे असेच काही लेटेस्ट फोटो तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहेत. परंतु, सध्या या फोटोंमुळे प्राजक्ताला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे.
प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे हे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती आसामी सिल्क साडी नेसलेली दिसत आहे. या साडीवर सुंदर असे लाल आणि निळ्या रंगाचं वर्क पाहायला मिळत आहे. प्राजक्ताने या साडीवर साजेसे दागिने घातले असून तिचे केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये प्राजक्ता खूपच सुंदर दिसत आहे. परंतु, प्राजक्ता या फोटोत ब्लाऊज परिधान न करताच साडी नेसलेली दिसत आहे. यावरून तिला नेटकरी ट्रोल करत आहेत.
अनेकजण प्राजक्ता या फोटोत खूपच सुंदर दिसत असल्याचे सांगत तिचे कौतुक करत आहेत. तर दुसरीकडे काहीजण ब्लाऊज न घालता साडी परिधान करणे ही कसली फॅशन आहे, असे म्हणत तिला ट्रोल करत आहेत. तिच्या या पोस्टवर कमेंट करताना एकाने लिहिले की, मॅडम ब्लाऊज घालायच्या विसरल्या वाटतंय. दुसऱ्या एकाने लिहिले की, आता ब्लाऊजची पण कंपनी शोधावी लागेल असं दिसतंय.
दरम्यान, नुकतीच प्राजक्ता अक्षय तृतीया आणि ईदच्या निमित्ताने करण्यात आलेल्या पोस्टमुळे चर्चेत आली होती. प्राजक्ताने अक्षय तृतीया आणि ईदच्या शुभेच्छा देत १ मे रोजी राज ठाकरेंद्वारे करण्यात आलेल्या भाषणाचे समर्थन केले होते. त्यानंतर तिने ती पोस्ट एडिट केली. परंतु, तोपर्यंत तिची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली होती.
प्राजक्ताने २००७ मध्ये आलेल्या ‘तांदळा एक मुखवटा’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २०११ मध्ये ‘क्या मस्ती क्या धूम’ या रियॅलिटी शोमधून प्राजक्ताने टीव्हीवरील प्रवासाची सुरुवात केली. या ‘शो’चे तिने विजेतेपदही पटकावले होते. २०१३ मध्ये आलेल्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेद्वारे प्राजक्ता घराघरांत पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केले आहे.
अभिनयासोबतच प्राजक्ताला नृत्याचीही खूप आवड आहे. वयाच्या सातव्या वर्षापासूनच तिने भरतनाट्यम शिकायला सुरुवात केली. आपल्या नृत्याची आवड जोपासत तिने झी मराठीवरील ‘एका पेक्षा एक’ या डान्स रियॅलिटी शोमध्ये सहभाग घेतला होता. त्यात तिने तिच्या नृत्याच्या अविष्काराने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
अभिनय, सौंदर्य आणि नृत्य याशिवाय प्राजक्ता एक उत्तम निवेदिकासुद्धा आहे. सध्या सोनी मराठी वाहिनीवर गाजत असलेल्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा प्राजक्ता माळी सांभाळत आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर खूपच सक्रीय असते. याद्वारे ती आपल्या वैयक्तिक आयुष्याबाबत तसेच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
महत्त्वाच्या बातम्या :
हिंदीच्या वादानंतर ‘या’ ७ लोकांनी अजय देवगणला दिले भारताच्या विविधतेचे धडे, वाचून तुम्हीही कराल कौतुक
VIDEO: सलमानच्या ईद पार्टीत दिसली कंगना; नेटकरी संतापले, ‘सरड्याचा रंग बदलत आहे’
आर माधवनच्या मुलाने यशाचे श्रेय दिले आई-वडिलांना; म्हणाला, त्यांनी माझ्यासाठी अनेक त्याग केले आहेत