Share

मनसे मेळाव्यानंतर प्राजक्ता माळीची फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल; “कोणत्याही राजकीय पक्षात…”

prajkta mali

राज्यात आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आतापासून वातावरण तापलं आहे. गेल्या दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा शिवाजीपार्क येथे संपन्न झाला. याचबरोबर राज ठाकरे काय भाषण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं.

गेल्या काही दिवसातल्या राजकीय घडामोडींबाबत राज ठाकरे काय भुमिका घेतात याची एकच चर्चा सुरु होती. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, काँग्रेसवर सडकून टीका केली. केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडीवरून राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे.

एकीकडे राज ठाकरे यांच्या भाषणानंतर राजकीय वातावरण तापले आहे. राष्ट्रवादीवर केलेल्या टीकेला खुद्द राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. तर दुसरीकडे मनसे मेळाव्यानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या फेसबुक पोस्टने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या निमित्तानं घेतलेल्या सभेला प्राजक्ता माळीनं देखील हजेरी लावली होती. यावेळचे काही व्हिडीओ फेसबुक शेअर करत प्राजक्ताने त्यासोबत एक पोस्टही लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

https://www.facebook.com/PrajakttaMaliOfficial/posts/515397879949506

तिने पोस्टमध्ये म्हंटलं आहे की, ‘नाही नाही… कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला नाही. काल आयुष्यात पहिल्यांदा राजकीय सभा अनुभवली (खूप दिवसांपासून अनुभवायचीच होती..) ते फक्त तुमच्याबरोबर शेअर करतेय… इतकाच हेतू. कलाकार नंतर, आधी मी माणूस- सामाजिक प्राणी आहे; त्याच्या समृद्धी करता पण झटायला हवं. म्हणून हा घाट. (आता माझ्या आधार कार्ड वर मुंबईचा पत्ता आहे.)’

दरम्यान, प्राजक्ता अनेकदा राजकीय कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळते. अशावेळी तिच्या पोस्ट सोशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरतात. अनेकदा प्राजक्ता रोखठोक मत देखील व्यक्त करताना दिसते. आताही तीची ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होतं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
‘ही’ कार म्हणजे छोटा पँकेट बडा धमाका! फक्त एका लीटर पेट्रोलमध्ये धावते 42 किमी; गिनिज बुक मध्येही नोंद
पत्नी परपुरुषाच्या मिठीत पाहून पतीला आला राग; मात्र पुढे कहाणीत आला ‘असा’ ट्विस्ट; वाचून थक्क व्हाल
पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास पाडायचा भाग; पोलिसांना पतीनं सांगितलं धक्कादायक कारण
आर्यन खान ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळण; मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू? नेमकं काय घडलं

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now