Share

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते प्राजक्ता माळीला मिळाला ‘हा’ पुरस्कार; पोस्ट शेअर करत म्हणाली,…

Prajakta Mali

मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali). बालकलाकाराच्या रूपात आपल्या करिअरची सुरुवात करत आज प्राजक्ता मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक झाली आहे. एक अभिनेत्री असण्यासोबतच प्राजक्ता उत्तम नर्तिका, निवेदिका आणि कवयित्रीसुद्धा आहे. आपल्या कौशल्याच्या आधारावर प्राजक्ताने आज सिनेसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

नुकतीच प्राजक्ताला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘कमला रायझिंग स्टार’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राजभवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला असून या सोहळ्यादरम्यानचे काही फोटो प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले आहेत. यासोबत तिने आजोयक, राज्यपाल आणि प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

प्राजक्ताने पोस्टमध्ये लिहिले की, ‘आणि कालच्या शुभमुहूर्तावर ‘मुंबई- राजभवनात’ जाण्याचा योग आला. काल महाराष्ट्राचे राज्यपाल – मा. श्री. भगतसिंग कोशारी यांच्या हस्ते ‘Kamala Rising Star’ पुरस्कार मिळाला. मनापासून धन्यवाद, आयोजन समिती व मा. राज्यपाल’.

‘अमित त्रिवेदी, प्रतिक गांधी, शेफ रणवीर ब्रार, बिझनेस वूमन अनन्या बिर्ला, धर्मेश, आकाश ठोसर इ. माझ्या काही आवडत्या व्यक्तींसह हा पुरस्कार मिळाला ह्याचा विशेष आनंद. प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन अशा पुरस्कारांमध्ये होतं असं मला वाटतं. त्यामुळे सर्व प्रेक्षकांचेदेखील मनापासून आभार. असंच प्रेम राहू द्या’.

या पुरस्कार सोहळ्यासाठी प्राजक्ता माळीचे आई आणि भाऊ खास पुण्याहून आले होते. पण त्यांच्यासोबत फोटो काढायचा राहून गेला, असे प्राजक्ताने पोस्टमध्ये म्हटले आहे. परंतु, प्राजक्ताच्या आईने आकाशसोबत आवर्जून फोटो काढला, असेही तिने शेवटी म्हटलं आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटींकडून लाईक आणि शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.

दरम्यान, प्राजक्ता काल अक्षय्य तृतीयाच्या दिवशी एका पोस्टमुळे फारच चर्चेत आली होती. तिने अक्षय तृतीया आणि ईदच्या शुभेच्छा देत १ मे रोजी राज ठाकरेंद्वारे करण्यात आलेल्या भाषणाचे समर्थन केले होते. त्यानंतर तिने तिची पोस्ट एडिट केली. परंतु, तोपर्यंत ती सोशल मीडियावर फारच चर्चेत आली होती.

महत्त्वाच्या बातम्या :
शत्रुघ्न सिन्हा यांच्यावर अभिनेत्रीचे खळबळजनक आरोप, म्हणाली, ‘माझी व्हर्जिनिटी विकून सोनाक्षी स्टार बनली’
सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारी ‘ती’ कामवाली बाई आहे तरी कोण? पहा तिचे ग्लॅमरस फोटो
पाठकबाईंचं लग्न अखेर ठरलं, साखरपुडाही झाला; नवरदेवाचे नाव ऐकून धक्काच बसेल

ताज्या बातम्या मनोरंजन

Join WhatsApp

Join Now