महाशिवरात्रीनिमित्ताने आज संपूर्ण देशभरात शंकराची पूजा केली जाते. महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकी एक आहे. शिव पार्वती विवाहाचा हा दिवस देशात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. देशभरातील शेकडो शिवमंदिरात भाविक पूजा अर्चना करतात आणि उपवास पाळतात.
याचबरोबर बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर महाशिवरात्री निमित्ताने फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा देत आहेत. सगळ्यांची लाडकी ‘स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने सोशल मीडियावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.
आज प्राजक्ताने महाशिवरात्रीनिमित्त जेजूरी गडावर जाऊन खंडोबाच दर्शन घेतले आहे. याबाबत प्राजक्ताने फेसबुक पोस्ट करत फोटो शेअर केले आहे. ‘महाशिवरात्र… कुलदैवत खंडोबा… वर्षातून एकदाच उघडणार्या भूलोक, पाताळलोक आणि स्वर्ग लोक या 3 लिंगांचे जेजुरी गडावर दर्शन घेतले,’ असे तिने म्हंटले आहे.
https://www.facebook.com/iamprajaktagaikwad/posts/514312400059915
सध्या प्राजक्ताने हे फोटो तूफान व्हायरल होतं आहेत. काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने जेजुरी गडावर जावून खंडा तलवार उचलली होती. याचे काही फोटो आणि व्हीडिओ तिने फेसबुकवर शेअर केले होते. आणि तेही फोटो प्रचंड व्हायरल झाले होते. तसेच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या प्राजक्ताचा फॅन फॉलोइंगसुद्धा मोठा आहे.
दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर महाशिवरात्रीच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. तर ती प्रार्थना करत असल्याचं दिसत आहे. प्राजक्ता माळीचे देखील फोटो सोशल मिडियावर व्हायरल होतं आहेत.
याचबरोबर पोस्ट शेअर करत प्राजक्ता म्हणाली, “नुकतीच मी ‘हरीहरेश्वराला’ जाऊन आले… (श्रीवर्धन जवळील) आणि खरंच प्रार्थना पुर्ण होतायेत, असं वाटतंय. हरीहरेश्वर – हरी (विष्णू), हर (शिव), ईश्वर (ब्रम्हा) अशी ३ स्वयंभू लिंग आहेत. मुळात हे मंदिर ३ डोंगरांच्या मध्ये वसलंय त्यामुळे त्याच हे नाव असावं अस मला वाटतं”, असे प्राजक्ता म्हणाली.
महत्त्वाच्या बातम्या
काशी विश्वनाथ मंदिरासाठी एका भक्ताने दान केले ६० किलो सोने; म्हणाला, माझं नाव सांगायचं नाय…
पत्नीला प्रियकरासोबत पाहून भडकला पती; केले असे काही कृत्य की वाचून हादरल
पत्नीच्या ‘या’ सवयीला कंटाळून युवराज सिंगने उचलले होते टोकाचे पाऊल, केला होता तिचा नंबर डिलीट
पुण्यात ट्रेकिंग करताना लहान मुलांवर मधमाश्यांनी केला हल्ला, 19 मुली 2 मुलांची प्रकृती गंभीर