“…म्हणून मी अजूनपर्यंत लग्न केलेले नाही”; ‘बाहुबली’ फेम प्रभासचा मोठा खुलासा

सध्या साऊथ चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकार हे यशाच्या शिखरावर आहेत. अनेक नवनवीन कथा घेऊन हे कलाकार चाहत्यांच्या भेटीला येत आहेत. मागील काही वर्षांपूर्वी ‘बाहुबली’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात साऊथ सुपरस्टार प्रभास मुख्य भूमिकेत होता. तसेच हा सुपरहिट ठरला होता.

 

सध्या प्रभास त्याच्या आगामी ‘राधे श्याम’’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे या चित्रपटाची प्रदर्शित तारीख पुढे ढकलण्यात आली होती. अशामध्येच काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. तर नुकताच चित्रपटाचा दुसरा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे.

 

प्रभासच्या अभिनयामुळे त्याचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. अनेक मुली त्याच्यासाठी वेड्या आहेत. त्याची झलक पाहायला नेहमी धडपड करत असतात. मात्र प्रभास अजूनही सिंगल आहे. त्याच्या लग्नाबाबत सर्वांनाच खूप मोठा प्रश्न पडला आहे. याच संदर्भात प्रभासला प्रश्न विचारण्यात आला आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च इव्हेंट पार पडला.

 

याच दरम्यान प्रभासने माध्यमांशी संवाद साधला. यामध्ये त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत काही गोष्टींवर खुलासा देखील झाला. यावेळी प्रभासने आपल्या लग्नाबद्दल खुलेपणाने आपले मत सांगितले आहे. जे ऐकून उपस्थित सर्वच लोकांना आपले हसू आवरणे कठीण झाले.

 

याच दरम्यान प्रभासला विचारले की, “चित्रपटात एक संवाद आहे की, प्रेमाबाबत तुझा अंदाज तितकासा अचूक नाही. खऱ्या आयुष्यात तुझा अंदाज काय आहे?” यावर प्रभासला म्हणाला की, “माझे प्रेमाचे अंदाज नेहमीच चुकीचे ठरले आहेत. म्हणूनच मी अजून लग्न केलेले नाही.” प्रभासचे हे मजेशीर उत्तर ऐकून तिथे उपस्थित सर्वजण हसू लागले.

 

पुढे प्रभास असेही म्हणाला की, “चित्रपटात मी जरी भविष्यवाणी करत असलो. तरी खऱ्या आयुष्यात अशा गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही.” याच दरम्यान प्रभासने अनेक प्रश्नांची उत्तरे देखील दिली आहे. प्रभाससोबत ‘राधे श्याम’ या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे देखील मुख्य भूमिकेत आहे.

 

प्रभासच्या खाजगी जीवनाबद्दल बोलायचे झाले तर, तो अभिनेत्री अनुष्का शेट्टीसोबत रिलेशनशिपच्या चर्चा सुरू होत्या. इतकेच नव्हे तर, या दोघांच्या लग्नाच्या बातम्यांनी देखील जोर धरला होता. असं देखील म्हटले जात होते की, प्रभासने तिचे लग्न थांबवले होते. दोघांच्या अफेअरच्या अनेक बातम्याही समोर येत असतात.

 

माध्यमांच्या माहितीनुसार, अनुष्का शेट्टी २०१५ मध्येच लग्नाच्या बेडीत अडकणार होती. परंतु तिचा एक चांगला मित्र आणि सहकलाकार असणाऱ्या प्रभासने तिला ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या सीरिजवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. यानंतर अनुष्काने प्रभासचा सल्ला ऐकला देखील होता.

 

तसेच प्रभासच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो ‘राधे श्याम’ या चित्रपटानंतर ‘सालार’ आणि ‘आदिपुरुष’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. तसेच ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे. तसेच या चित्रपटातील प्रभासचा फर्स्ट लुकही प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रामायणवर आधारित आहे.