साऊथ इंडियाचा सुपरस्टार प्रभास त्याचा आगामी चित्रपट आदिपुरुषमुळे चांगलाच चर्चेत आहे. आदिपुरुषचा टिझर रिलीज करण्यात आला होता. पण त्याच्या व्हीएफक्सवर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यामुळे दिग्दर्शकांनी त्याची रिलिज करण्याची तारीख पुढे ढकलली आहे.
आदिपुरुष चित्रपट हा बिग बजेट सिनेमा असून त्यामध्ये प्रभाससोबत क्रिती सेनन सुद्धा दिसणार आहे. आदिपुरुष या चित्रपटापासून त्यांची चांगलीच चर्चा होत आहे. आदिपुरुषच्या शुटींगदरम्यान त्यांच्यातील जवळीक वाढली असल्याचेही म्हटले जात आहे.
तसेच प्रभासने आदिपुरुषच्या सेटवर क्रितीला गुडघ्यावर बसून प्रपोज केले होते. क्रितीने या प्रपोजला होकार दिला होता, अशी सुद्धा चर्चा होती. पण यावर बोलताना क्रिती या सर्व अफवा असल्याचे म्हटले होते. पण आता पुन्हा एकदा त्यांचे नाते चर्चेत आले आहे.
दोघेही एकमेकांना डेट करत आहे असे कित्येक दिवसांपासून बोलले जात आहे. असे असतानाच आता क्रिती आणि प्रभासच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली आहे. विदेशी सेन्सॉर बोर्डाचे सदस्य उमेर संधू यांनी एक ट्विट केले आहे. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे.
क्रिती सेनन आणि प्रभास पुढील आठवड्यात मालदीवमध्ये साखरपुडा करणार आहे. खुप भारी वाटतंय, असे ट्विट उमेर संधू यांनी केले आहे. त्यांचे हे ट्विट सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. पण अजूनही क्रिती आणि प्रभासने या बातमीबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.
आता दोघांचेही चाहते त्यांच्या साखरपुड्याच्या घोषणेची वाट पाहत आहे. दोघांच्या नात्याची चर्चा वरुण धवनच्या भेडीया चित्रपटापासून सुरु झाली होती. वरुण धवन आणि क्रिती झलक दिख ला जा च्या शोमध्ये चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. त्यावेळी त्याने मस्करीत क्रिती प्रभासला डेट करतेय असे सांगून टाकले होते. तेव्हापासून त्यांच्या नात्याची चर्चा होत आहे,
महत्वाच्या बातम्या-
सकाळी विरोधात बातमी टाकली, दुपारी गाडी खाली येऊन पत्रकाराचा मृत्यू, शिंदे-फडणवीसांशी कनेक्शन?
शिवसेनेच्या नावावर आणि चिन्हावर निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, म्हणाले, चिन्ह आणि नाव…
बॉलिवूडच्या ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात वेडा झालाय प्रभास, सेटवरच केलं होतं प्रपोज; अभिनेत्री म्हणाली…