रशिया आणि युक्रेनच्या वादाचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटण्यास सुरूवात झाली आहे. मुख्य म्हणजे या सगळ्यात युध्दाचे अनेक हृदय पिळवून टाकणारे फोटो सोशल मिडीयाच्या माध्यमातून समोर येऊ लागले आहेत. दुसऱ्या बाजूला युध्दाची दाह्कता बघता कित्येक जणांनी निर्माण झालेल्या परिस्थितीवर हळहळ व्यक्त केली आहे.
यामध्ये प्रख्यात दिग्दर्शक आणि लेखक विजू माने यांचा देखील समावेश आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युध्दाच्या पार्श्वभूमीवर, विजू माने यांनी युध्द नको बुध्द हवा अशी भावना व्यक्त केली आहे. विजु माने यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत युध्दाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “युध्द नकोच बुध्द हवा. मला चांगले ठाऊक आहे मी माझ्या फेसबुकच्या वॉलवर काही लिहिल्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष युद्ध थांबवणार नाहीत. पण ‘युद्ध नको’ ही भावना माझ्या आजूबाजूच्या लोकांमध्ये पसरवणे मला महत्त्वाचं वाटतं.
आपण एखाद्याच्या आक्रमक विचाराच्या आहारी जाऊन कुठल्याही गोष्टीचं समर्थन करा, पण युद्धाचं कधीच नको. युद्धाने कधीच कोणी जिंकत नसतं.” अशा आशयाची पोस्ट विजू माने यांनी केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एक फोटो देखील शेअर केला आहे.
या फोटोमध्ये दोन सैनिक हातात बंदुक घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्या शेजारीच एक लहान मुलगा बंदुकीला भित भिंतीआड लपला आहे. या फोटोसह विजू माने यांच्या पोस्टला अनेकजणांनी शेअर केले आहे. मुख्य म्हणजे, खरच युध्द नको बुध्द हवा अशा कमेंट देखील पोस्टवर करण्यात आल्या आहेत.
रशिया आणि युक्रेनच्या वादाने सर्वांनाच चिंतेत पाडले आहे. या वादाचा परिणाम जनसामान्यांवर होताना दिसत आहे. परंतु युध्द थांबण्याचे कोणतेच चित्र अद्याप तरी दिसत नाही. या युध्दात कित्येक लोकांनी आपल्या प्रियजणांना गमावले आहे. या युध्दाच्या संबंधीत कित्येक व्हिडीओ समोर येत आहेत. ज्यात युध्दाची भीषणता सहजच दिसून येत आहे.
महत्वाच्या बातम्या
“मलिकांना अटक झाल्यावर थयथयाट करणारे एसटीचा संप मिटवण्यासाठी काहीच का करत नाहीत?”
शाळेत मोबाईल वापरताना शिक्षिकेने पकडले, विद्यार्थ्यांना दिली भयंकर शिक्षा, व्हिडीओ पाहून अवाक व्हाल
द्रविड-गांगुलीशी पंगा घेणं वृद्धिमान साहाला महागात पडणार, BCCI करणार ‘ही’ कारवाई,
अखेर शालिनी हत्या प्रकरणाचा झाला उलगडा, प्रियकरानेच केली होती हत्या, कारण ऐकून पोलिसही चक्रावले