छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेत्रींनी आपल्या अदाकारीने चाहत्यांची मने जिंकली आहे. उत्कृष्ट अभिनयाने या अभिनेत्रींनी चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केले. त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री आपल्या चाहत्यांसोबत फोटोज आणि व्हिडिओ शेअर करत असतात.
अशीच एक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे जी आपल्या गोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. ती अभिनेत्री म्हणजे निया शर्मा होय. ती नेहमीच तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत असते. ती तिच्या चाहत्यांना प्रभावित करण्यात कधीच कमी पडत नाही.
नुकतेच तिने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांच्या ह्रदयाचा ठोका चुकला आहे. तिच्या फोटोवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स आणि शेअर केले जात आहेत. त्याचबरोबर चाहते या फोटोला प्रतिक्रिया देत आपले प्रेम व्यक्त करत आहे.
या फोटोंमध्ये नियाने डीप नेक टॉप घातलेला आहे. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. याचबरोबर तिने मॅचिंग कलरची पँट घातली आहे. या आउटफिटमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत आहे. तिने वेगवेगळ्या बोल्ड स्टाइलमध्ये फोटोशूट केले आहेत, ज्यावर चाहते फिदा झाले आहेत.
नियाने हे फोटो तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. ज्याला खूप कमी कालावधीत ११ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्याचबरोबर काही चाहत्यांनी या फोटोंवर आपली प्रतिक्रिया देखील दिल्या आहे. एका चाहत्याने लिहिले की, ‘कोणी इतके सुंदर कसे असू शकते.’ आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘मॅडम तुम्ही आग लावली.’ काही चाहत्यांनी तिला ‘हॉटी’ म्हटले आहे. तर काहींनी तिला ‘सेक्सी’ म्हटले आहे. अशा प्रकारे चाहत्यांनी नियाच्या हॉट लूकचे कौतुक केली आहे.
तसेच याअगोदर नियाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये निया शर्मा रिवीलिंग ड्रेस घातलेला दिसून येत आहे. या व्हिडिओमध्ये नियाने हलका मेकअप केला आणि केस मोकळे सोडले आहेत. नियाने हा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत नियाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘पहिले शॅम्पू आणि नंतर कंडिशनर.’ या व्हिडिओला देखील चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाइक्स मिळाल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CZcE5sshiWx/?utm_medium=copy_link
नियाच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तिने ‘एक हजारो मे मेरी बहना है’ ज्या मालिकेपासून अभिनयाची सुरुवात केली होती. त्यानंतर ‘जमाई राजा’, ‘नागिन’ आणि ‘इश्क मे मरजावां’ या मालिकेत काम केले आहे. त्याचबरोबर ‘खतरो के खिलाडी ८’ मध्ये ही ती होती.