लाखोंचे बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवून, जळगावात अज्ञातांनी एका महिलेला तब्बल ९२ हजारांचा गंडा घातला आहे. घरच्या पत्त्यावर पोस्टाने आलेले बंद पाकीट उघडून, त्यातील क्रॅशकार्डवरची रक्कम मिळवण्याचे आमिष महिलेला महागात पडले आहे.(Post opened the wallet that came home and the woman was cheated)
संबंधित क्रॅशकार्डवरची साडेसहा लाख रुपये रक्कम मिळवण्याचे आमिष महिलेला चांगलेच महागात पडले आहे. क्रॅशकार्डवरील साडेसहा लाख रुपये रक्कम मिळवण्याच्या नादात महिलेची ९२ हजारांची फसवणूक झाली आहे. शीतल राजेश काबरा असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतल राजेश काबरा या जळगावातील नवाल हॉस्पिटल येथे मॅनेजर म्हणून नोकरीला आहेत. बुधवारी शीतल यांच्या घरी पोस्टाने एक पाकीट आले. पाकीट उघडून बघितले असता त्यामध्ये एक नापतोल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे पत्र व क्रॅश कूपन कार्ड होते.
कूपन क्रॅश केले असता त्यावर तुम्ही ६.५०.००० (you win 6.50,000) असा संदेश दिला होता. हे पैसे मिळवण्यासाठी 19 rub असा एसएमएस कोड लिहिला होता. क्रॅशकार्डवरील पैसे मिळवण्यासाठी शीतल काबरा यांनी त्या पत्रावरील हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधला होता.
हेल्पलाइन नंबरवर बोलणार्या संबंधितांनी सांगितल्यानुसार, शीतल काबरा यांनी बँकेची डिटेल्स संबंधितांच्या व्हॉट्सअपवर पाठवली. त्यानंतर संबंधितांनी फोन करून वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स सांगून शीतल काबरा यांना गूगल पे ने रक्कम पाठविण्यास सांगितले.
याप्रकारे शीतल काबरा यांनी २ दिवसात वेळोवेळी ९२ हजार रुपये त्या अज्ञातांना पाठवले. पैसे पाठवल्यानंतरही त्यांना कोणतीही रक्कम मिळाली नाही. आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर शीतल काबरा यांनी जिल्हापेठ पोलिसांत तक्रार दिली. या तक्रारीनंतर त्या अज्ञातांनवर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल जयंत कुमावत हे करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
आता करोडपती झाले आहेत योगी आदित्यनाथ, वाचा मुख्यमंत्री बनल्यानंतर किती पटीने वाढली त्यांची संपत्ती
मोठी बातमी! पुण्यात गाडी अडवून शिवसैनिकांनी किरीट सोमय्यांवर केला हल्ला, घटनेचा व्हिडीओ व्हायरल