खरं तर हे प्रकरण, जयपूरमध्ये आयकर विभागात (Income tax department) 100 कोटींच्या मालमत्तेची मालकीन असलेल्या पण कुटुंब चालवण्यासाठी तिला पायपीट करावी लागत असलेल्या आदिवासी महिलेच आहे. आयकर विभागाने जयपूर दिल्ली हायवेवर 100 कोटींहून अधिक किमतीची 64 बिघा जमीन शोधून काढली आहे, ज्याची मालकीन एक आदिवासी महिला आहे आणि त्यांनी ही जमीन कधी विकत घेतली आणि ती कुठे आहे हे देखील तिला माहिती नाही? आता या जमिनी आयकर विभागाने ताब्यात घेतल्या आहेत.(Poor woman owns land worth Rs 100 crore)
जयपूर-दिल्ली महामार्गावरील दांड गावात येणाऱ्या या जमिनींवर आयकर अधिकाऱ्यांनी बॅनर लावले आहेत! या बॅनरवर ‘बेनामी मालमत्ता प्रतिबंध कायद्यांतर्गत’ असे लिहून ही जमीन बेनामी घोषित करून, प्राप्तिकर विभाग ती ताब्यात घेत आहे. 5 गावांच्या 64 बिघा जमिनीवरील बॅनरवर संजू देवी मीना या जमिनीच्या मालक असल्याचे लिहिले आहे. जे या जमिनीचे मालक असू शकत नाहीत, त्यामुळे आयकर विभाग ही जमीन तातडीने ताब्यात घेत आहे!
या प्रकरणाची चौकशी करून दीपवास गावात पोहोचल्यावर संजू देवी मीना यांनी सांगितले की, तिचा नवरा आणि सासरे मुंबईत कामाला होते. त्यादरम्यान, 2006 मध्ये, त्यांना अंबर, जयपूर येथे नेण्यात आले आणि एका ठिकाणी त्यांचा अंगठा घेण्यात आला. मात्र पतीच्या निधनाला 12 वर्षे झाली असून त्यांच्याकडे कोणती मालमत्ता आहे आणि ती कुठे आहे, याची माहिती नाही.
नवर्याच्या निधनानंतर घरी कोणीतरी 5000 रुपये द्यायचे, त्यातील अडीच हजार रुपये आत्ते बहिणीला द्यायचे आणि मी अडीच हजार ठेवायचे, पण आता बरीच वर्षे झाली आहेत. पैसेही द्यायला कोणी येत नाही. माझ्याकडे इतकी संपत्ती आहे हे मला आजच कळलं! संजू देवी मीना यांच्या बोलण्यावरून आपल्याला समजते की, त्यांना या गोष्टींची बिलकुल माहिती नव्हती.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली आणि मुंबईतील उद्योगपती मोठ्या प्रमाणात दिल्ली महामार्गावर आदिवासींच्या जमीनी बनावट नावाने खरेदी करत असल्याची तक्रार प्राप्तिकर विभागाला प्राप्त झाली होती. ते केवळ कागदावरच व्यवहार होत आहेत. कायद्यानुसार फक्त आदिवासीच आदिवासी जमीन खरेदी करू शकतात.
ते कागदावर विकत घेतल्यानंतर, ते त्यांच्या लोकांच्या नावाने पॉवर ऑफ अॅटर्नी ठेवतात. यानंतर आयकर विभागाने त्याच्या खऱ्या मालकाचा शोध सुरू केला, तेव्हा माहिती मिळाली की, जमिनीचा मालक राजस्थानमधील सीकर जिल्ह्यातील नीमच्या थाना तहसीलच्या दीपवास गावात राहते.
महत्वाच्या बातम्या-
अमोल कोल्हे म्हणतात, मैं थकेगा नहीं साला हातात टायर अंगात फायर; पहा कोल्हेंचा फिटनेस व्हिडिओ
रनवे ३४ ट्रेलर: जेव्हा पायलटने सिगरेट ओढल्यामुळे झाला होता ५१ लोकांचा मृत्यु, वाचा खरी कहाणी
तुमच्याकडे या तीन नोटा असतील तर तुम्ही रातोरात होऊ शकता करोडपती; जाणून घ्या प्रक्रिया