‘लॉक अप'(Lock up) चा नवीनतम भाग सर्व स्पर्धकांसाठी, विशेषतः पूनम पांडेसाठी खूप भावूक होता. पूनम पांडेची इमेज अतिशय बोल्ड, पण कॉन्ट्रोवर्शल मॉडेलची राहिली. या इमेजमुळे पूनम पांडेला अनेक वेळा अश्लील गोष्टी आणि अनेक टोमणेही ऐकायला मिळाले.(poonam-pandeys-mother-who-came-before-the-world-for-the-first-time-cried-and-said-this-is-my-son)
पूनम पांडेला वैयक्तिक आयुष्यातही खूप त्रास सहन करावा लागला, ज्याबद्दल पूनम पांडे ‘लॉक अप’मध्ये अनेकदा बोलताना बघितले असेल. पूनम पांडेला जग खूप टोमणे मारते, तिला वाईट बोलले जाते, पण तिच्या आईसाठी ती हिरा आहे. तो हिरा, ज्याच्या तेजाने केवळ तिचेच आयुष्य नाही तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्यही उजळले.
लॉक अपच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये पूनम पांडेची आई आली होती. पूनम पांडेची आई पहिल्यांदाच जगासमोर आली आहे. येताच त्यांनी पूनम पांडेवर प्रेमाचा खूप वर्षाव केला.
पूनम पांडेची(Poonam Pandey) आई येताच सर्वांना म्हणाली, ‘या मुलीने माझ्या आयुष्यात खूप आनंद दिला. आयुष्यात अशी कोणती गोष्ट नव्हती जी या मुलीने दिली नाही. तिच्यासाठी मनातून आशिर्वाद निघतात.
शोच्या एका एपिसोडमध्ये पूनम पांडेने तिचे स्ट्रगलचे दिवस आठवले आणि तिचे बालपण कसे होते ते सांगितले. पूनमने सांगितले होते की, तिच्या कुटुंबाला खूप आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. अनेकवेळा रेशनसाठी पैसे नव्हते. अशा वेळी अनेकवेळा मिठाच्या पाण्यात भात खाऊन जगावे लागले.
पूनम पांडेने कबूल केले की, तिने आयुष्यात अनेक गोष्टी केवळ प्रसिद्धीसाठी केल्या, पण तिच्यामुळेच आज तिचा भाऊ आणि बहीण आयुष्यात सेटल आहेत. कुटुंबही आनंदी आहे. यानंतर पूनम पांडेच्या आईने आपल्या मुलीला लाडू खाऊ घातले आणि नंतर तिच्या वहिनीला दोन जुळ्या मुली(Twin girls) झाल्याची आनंदाची बातमी देत रडली. तेव्हा आईने पूनम पांडेला मिठी मारली आणि रडत म्हणाली, ‘माझी मुलगी नाही, हा माझा मुलगा आहे.’
‘लॉक अप’मध्ये पूनम पांडेलाही अनेकदा शिवीगाळ करताना दाखवण्यात आले होते. यासाठी तिने आईची माफी मागितली. पुनम पांडेची आई घरातून चालली तेव्हा तिने मुलीची नजरही काढली. पूनम पांडेला वाटले की कदाचित तिला घरून कोणी भेटायला येणार नाही, पण जेव्हा तिची आई आली तेव्हा तिला खूप आनंद झाला.