बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतच्या लॉकअप (Lock Upp) या शोमध्ये दररोज अनेक ड्रामा पाहायला मिळते. फिनाले वीकमध्ये पोहोचण्यासाठी स्पर्धकांमध्ये जोरदार लढत सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये एकीकडे स्पर्धकांमध्ये भांडण होत आहे तर दुसरीकडे त्यांचे डार्क सीक्रेट्स सर्वांनाच आश्चर्यचकित करत आहेत. यादरम्यान शोमध्ये चांगले मित्र बनलेल्या पूनम पांडे आणि मुन्नवर फारूकी यांच्यात आता फूट पडल्याचे दिसून येत आहे.
लॉकअप शोमध्ये पूनम पांडेचे मुन्नवरसह, अंजली अरोरा आणि सायशा शिंदेसोबत चांगली मैत्री आहे. परंतु, टिकट टू फिनाले टास्करदरम्यान या तिघांनी मिळून पूनमला टास्कमधून बाहेर काढले. आणि यामागचे कारण देताना त्यांनी म्हटले की, पूनम स्वतः हा शो सोडून जाऊ इच्छित आहे. तसेच तिने शोमध्ये खूप कमी योगदान दिले आहे.
आपल्याच मित्रांकडून असा धोका मिळाल्याने पूनम पूर्णपणे तुटून गेली. तिचा हा दुःख अश्रूंच्या रूपात बाहेर पडला. मित्रांच्या अशा वागणूकीनंतर पूनम आपले स्पष्टीकरण देताना म्हणाली की, ती खूप साऱ्या आरोग्यासंबंधित समस्यांशी झुंज देत आहे. मागील काही महिन्यांपासून तिला पीरियड्स आले नसून या कारणामुळेच ती मागील टास्कमध्ये तिचे पूर्ण योगदान देऊ शकली नाही.
https://twitter.com/firstindiatelly/status/1515965561867583489?s=20&t=6kOZya8YLMkwPKhwuk71nQ
पूनम प्रिंस नरूलाशी रडत सांगते की, मागील काही महिन्यांपासून माझे पीरियड्स आले नाहीत. त्यामुळे मला अनेक आरोग्य समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यानंतर पूनम मुन्नवरला म्हणते की, मी तुला अनेक टास्कमध्ये जिंकवले. मला काही आरोग्याच्या समस्या आहेत. ते मी कॅमेऱ्यासमोर सांगू शकत नाही. सातत्याने रूग्णालयात जात असूनही मी खेळत आहे.
यानंतर मुन्नवर फारूकी पूनम पांडेच्या पीरियड्सच्या समस्यावर चर्चा करताना दिसून येतो. मुन्नवर प्रिंस नरूलाला म्हणतो की, पूनम पीरियड्सबाबत खोटं बोलत आहे. कारण एक आठवडाभरापूर्वीच एक टास्क जिंकल्यानंतर पूनम पांडेने मुन्नवरला सांगितले होते की, टास्करदम्यान तिला पीरियड्स होते. तरीसुद्धा तिने तिचा बेस्ट दिला.
त्यानंतर आपल्या मित्रांचे असे वागणे बघून पूनम स्मोकिंग एरियात बसून रडताना दिसली. तर पूनमला असे रडताना बघून मुन्नवरने तिला म्हटले की, तू का रडत आहे. सर्वजण केवळ आपापला गेम खेळत आहेत. दरम्यान, आता शोमध्ये स्पर्धकांमधील नाते कोणते वळण घेतील, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
४५ वर्षांच्या वयातही हॉट दिसते ‘आओ राजा’ गाण्यातील चित्रांगदा, सुंदर दिसण्यासाठी पिते ‘हे’ खास ड्रिंक
रिंकू राजगुरूच्या पांढऱ्या रंगाच्या साडीतील फोटो पाहून चाहत्यांना झाली श्रीदेवीची आठवण; म्हणाले, कडक आर्ची
सुशांत सिंह राजपूतपासून ते सिद्धार्थ शुक्लापर्यंत, या कलाकारांनी मृत्यूनंतर दान केली त्यांची संपत्ती