Share

पाँडिचेरी: स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आलेला पहिलाच मराठी चित्रपट; ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

pondicherry movie

‘वजनदार’, ‘गुलाबजाम’, ‘राजवाडे अॅन्ड सन्स’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे सचिन कुंडलकर प्रेक्षकांसाठी आणखी एक नवा चित्रपट घेऊन येत आहेत. ‘पाँडिचेरी’ (pondicherry movie) असे या चित्रपटाचे नाव असून नुकतीच या चित्रपटाचा पोस्टर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. तर टीझर पाहून चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘पाँडिचेरी’ या चित्रपटाचे लेखन सचिन कुंडलकर आणि तेजस मोदक यांनी केले आहे. तर चित्रपटाची प्रस्तुती अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी व तेजस्विनी पंडित आणि संतोष खेर यांच्या ‘क्रिएटिव्ह वाईब्स’च्या सहयोगाने करण्यात आली आहे. तसेच सचिन कुंडलकर यांनी नील पटेल यांच्यासोबत चित्रपटाच्या निर्मात्याचीही धुरा सांभाळली आहे.

प्लॅनेट मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर चित्रपटाचा टीझर शेअर करत लिहण्यात आले की, ‘पाँडिचेरी, दूरवर राहणाऱ्या कुटुंबाची गोष्ट.. २५ फेब्रुवारीपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..’ यासोबतच चित्रपटातील कलाकार मंडळींनीही त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर ‘पाँडिचेरी’चा टीझर शेअर केला आहे.

या चित्रपटात वैभव तत्ववादी, सई ताम्हणकर, महेश मांजरेकर, नीना कुलकर्णी, गौरव घाटणेकर, तन्मय कुलकर्णी अशी अनेक तगडी स्टारकास्ट मंडळी पाहायला मिळणार आहेत. ‘पाँडिचेरी’ या चित्रपटात नात्याची आणि कुटुंबाची नवी परिभाषा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे हा संपूर्ण चित्रपट स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे.

यासंदर्भात सांगताना अमृता खानविलकरने लिहिले की, ‘पाँडिचेरी हा खूपच खास चित्रपट आहे. संपूर्ण चित्रपट केवळ मोजक्याच पण प्रेमळ क्रू मेंबर्ससोबत स्मार्टफोनवर चित्रित करण्यात आला आहे. भेटूया २५ फेब्रुवारी रोजी सिनेमागृहात’.

महत्त्वाच्या बातम्या :
रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’चा टीझरने जिंकले सर्वांचे मन, या दिवशी चित्रपटगृहांमध्ये होणार प्रदर्शित
शारिरीक संबंध न ठेवताच तेजस्वी प्रकाश बिग बॉसच्या घरात झाली प्रेग्नेंट? घरातील सदस्याचा खुलासा
सागर कारंडे ‘चला हवा येऊ द्या’ शोमधून पडला बाहेर? सागर कारंडे स्वत:च खुलासा करत म्हणाला..

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now