महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. मात्र राज ठाकरे औरंगाबादला जाण्याआधी ते वढू या ठिकाणी संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत. परंतु माहितीनुसार, राज ठाकरे वढूला पोहोचण्याआधीच त्या ठिकाणी भाजपचे नेते आणि हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे दाखल झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे .
राज ठाकरे उद्या औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. ठाकरे पुण्यातून कार्यकर्त्यांच्या ताफ्यात रवाना झाले आहेत. यावेळी ठाकरेंवर पुष्पफुलांचा वर्षाव करत पुरोहितांनी मंत्रांचं पठण केलं. मात्र, राज ठाकरे औरंगाबादला जाण्याआधी ते संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत.
त्यासाठी ते वढू याठिकाणी जाणार आहेत. मात्र राज ठाकरे यांच्या वढू याठिकाणी जाण्याआधीच भाजपचे नेते आणि हिंदुत्ववादी नेते मिलिंद एकबोटे त्या ठिकाणी दाखल झाले आहेत. अशी माहिती समोर आलेली आहे. या सुरू असलेल्या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेंगडे देखील या ठिकाणी पोहोचले आहेत. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्तेही पोहोचले आहेत. थोड्याच वेळात राज ठाकरे वढूला दाखल होणार आहेत. वढूला हे सगळे एकत्र येत असल्याने विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेला भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता औरंगाबादमधील राज ठाकरे यांच्या सभेला देखील हिंदुत्ववादी नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती पुढे येत आहे. ठाकरे यांच्या सध्याच्या भूमिकेवर भाजपचे नेते पाठिंबा देत आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असा काल मनसे नेत्यांनी दावा केला होता. त्यामुळे एकूणच या राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष आहे.