Share

हिंदू- मुस्लिम नावाने फूट पाडणाऱ्या राजकीय नेत्यांना ‘या’ घटनेमुळे मिळाली मोठी चपराक

सध्या महाराष्ट्र राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा यावरून राजकारण तापलं आहे. कुठे लाऊडस्पीकर काढण्यात येत आहे तर कुठे याला विरोध करण्यात येत आहे. यामुळे सामाजिक वातावरण खराब होऊ लागलं आहे. अशावेळी, बिहारची राजधानी पाटणा मध्ये हिंदू-मुस्लिममध्ये परस्पर सौहार्द आणि बंधुभावाचे उदाहरण पाहायला मिळाले.

बिहारची राजधानी पाटणा येथे 50 मीटर अंतरावर असलेले मंदिर आणि मशीद एकमेकांच्या प्रार्थना आणि समारंभांचा आदर करून जातीय सलोख्याचे उदाहरण देताना समोर आले आहे. येथील मशीद आणि मंदिरदरम्यान 50 मीटर अंतर आहे. येथे एकमेकांप्रती सन्मान दर्शवित मशिदीकडून मंदिरात येणाऱ्या भक्तांची काळजी घेतली जाते.

पाटणा स्टेशनजवळ महावीर मंदिर आहे तर त्याच्यापासून 50 मीटर अंतरावर न्यू मार्केटमध्ये पाटणा मशीद आहे. पाटणा येथील मशिदीचे अध्यक्ष फैसल इमाम यांच्या मते, मंदिर आदर म्हणून अजान दरम्यान लाऊडस्पीकर बंद करते. तर, रामनवमीनिमित्त मंदिरात आलेल्या भाविकांना मशिदीकडून शरबत वाटप करण्यात येतो.

रामनवमीच्या दिवशी मंदिरात आलेले भाविक मशिदीसमोर रांगेत उभे असताना त्यांना शरबत वाटप केला जातो. रामनवमीच्या दिवशी मंदिरातील लाऊडस्पीकरवर दिवसभर भजन-कीर्तन वाजतात. परंतु, अजानच्या वेळी ते बंद केले जातात, असे मशिदीचे अध्यक्ष फैसल इमाम यांनी सांगितले.

पाटणाच्या महावीर मंदिराचे अध्यक्ष किशोर कुणाल यांनी सांगितले की, आम्ही अनेकदा एकमेकांना मदत करतो आणि बंधुभाव राखतो. आम्हाला ना अजानमध्ये काही अडचण आहे ना त्यांना भजन-कीर्तनाची काही अडचण आहे, असे किशोर कुणाल यांनी सांगितले.

पाटणामधील या घटनेमुळे सध्या देशभरात वाजणाऱ्या लाऊडस्पीकर वरून वादंग असताना सर्व राजकीय नेत्यांसह विभाजन करू पाहणाऱ्यांना सणसणीत प्रतिउत्तर मिळालं आहे. यामुळे कुठेतरी समाजातील हिंदू-मुस्लिम हम सब एक है असं म्हणणारा आदर्श समूह पुढं आल्याचे दिसत आहे.

राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now