Raid on lodge in Jalgaon: जळगावमध्ये पोलिसांनी एमआयडीसी परिसरातील लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात १३ जोडप्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने जळगावमध्ये एकच खळबळ माजली. पोलिसांनी अचानक टाकलेल्या छाप्यामुळे ही जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आली आहेत.
जळगावच्या शहर भागात असणाऱ्या दोन लॉजवर पोलिसांनी छापे टाकले. एका लॉजवर तीन मुले व तीन मुली सापडल्या आहेत. तसेच दुसऱ्या लॉजवर १० जोडपी पोलीसांनी ताब्यात घेतली आहेत.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार दलालांमार्फत मुली पुरवण्याचे काम या ठिकाणी होत होते. पोलिसांनी ही धडक कारवाई केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मुलींनी मात्र याबाबत वेगळीच माहिती दिल्याचे समोर येत आहे.
आपण आपल्या मर्जीने या ठिकाणी आलो, असा दावा मुलींकडून करण्यात आला. त्यामुळे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे ही तरुण मुलं-मुली आता अडचणीत सापडली असल्याचे दिसते.
यातील काही मुली महाविद्यालयात शिक्षण घेत असून काही मुली परप्रांतीय आहेत. मात्र आता जळगावमध्ये स्थायिक झालेल्या आहेत. शहरातील परिसरात अनैतिक प्रकार घडत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मात्र यादरम्यान एका मुलीला दलालाने आणल्याचे उघड झाले आहे. तर मुलींनी मात्र आपण स्वतःच्या मर्जीने आलो आहोत असे पोलिसांना सांगितले. घटनास्थळाची पूर्ण तपासणी करून पोलीस अटक केलेल्या व्यक्तींची कसून चौकशी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या-
राजू श्रीवास्तवांच्या प्रकृतीबाबत धक्कादायक माहिती आली समोर; डॉक्टरांनी सोडली आशा, अन्…
औरंगाबादेत शिवसेनेला जबर धक्का! उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यानेही धरली शिंदे गटाची वाट
magical hug : तरुणाने मारलेली कडकडून मिठी तरुणीला पडली महागात, मोडली छातीची तीन हाडे अन् पुढे…