Share

ज्या चोरांनी पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली त्याच चोरांसोबत पोलिसांची मटन पार्टी

उपविभागीय अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या वाळू माफियांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी त्यांच्यासोबतच मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, संबंधित प्रकार पाहून पोलीस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत.

ही घटना भंडाऱ्यातून समोर आली आहे. उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या वाळू माफियांसोबत पोलिसांनीच मटण पार्टी केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा संबंधित व्हिडीओ देखील समोर आला आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी तेथील स्थानिक आमदारांनी केली आहे.

मटण पार्टी करणारे पवनी पोलीस आहेत. हे उपविभागीय अधिकारी यांना मारहाण करणाऱ्या आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. हे आरोपी वाळू माफिया होते. मात्र या आरोपींना न पकडता उलट यांच्यासोबतच या पवनी पोलीस अधिकाऱ्यांनी मटण पार्टी केली. आरोपींसोबत मटण पार्टी करतानाचा हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.

माहितीनुसार, हा व्हिडीओ भंडारा -पवनी विधानसभा क्षेत्राच्या एका आमदाराने प्रसारमाध्यमांना दिला आहे. या आमदाराचे नाव नरेंद्र भोंडेकर आहे. हा व्हिडीओ दाखवत पोलीस आणि वाळू माफियांचे संबंध किती सुमधुर आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. पार्टी करणाऱ्या पोलिसांचे नाव दिलीप ढवळे आहे.

तसेच आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या आरोपींना पवनी पोलीस कसे पकडतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. संबंधित आरोपींसोबत मटण खाणाऱ्या या पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी प्रशासनाला केली आहे.

दरम्यान, बुधवारी पहाटे साडे तीन वाजेदरम्यान भंडारा उपविभागीय अधिकाऱ्यांवर 20 ते 25 वाळू माफियांनी हल्ला चढवत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. तसेच, त्यांना मारहाण करण्यात आली. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी यांनी पवनी पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला होता.

इतर

Join WhatsApp

Join Now