ट्रॅफिक नियम मोडल्याने जास्त दंड आकारला गेला? ‘अशाप्रकारे’ घरबसल्या दाखल करा तक्रार

शहर वाहतूक पोलिस शाखेकडे वाहतूक नियमभंगाचे चुकीचे ई-चलन प्राप्त झालेल्या अनेक लोकांच्या तक्रारी येत असतात. या तक्रारी कधी ट्विटर, फेसबुक तर कधी पत्राद्वारे पाठविण्यात येतात. चालकाची चुक नसताना देखील त्याच्या नावाची पावती अनेकवेळा फाडण्यात येते. कधी कधी तर जास्त दंड ही त्यांच्याकडून आकारण्यात येतो. परंतु अशा सर्वच तक्रारी पोलिसांपर्यंत पोहचल्या जात नाही.

त्यामुळे यावर पर्यायी मार्ग पोलिसांनी शोधून काढला आहे. वाहतूक पोलिसांनी ई- तक्रारीबाबतच्या तक्रारींसाठी एक ॲप आणले आहे. या ॲपमुळे नागरिकांचा वेळ ही वाचणार आहे. तसेच जर काही तांत्रिक बिघाडामुळे ई-चलनवरील दंड चालकाला जास्त गेला तर तो त्याविषयी त्वरीत तक्रार दाखल करू शकणार आहे.

चालकाला सतत पोलिस ठाण्यात फेऱ्या मारण्याची गरज ही या ॲपमुळे पडणार नाही. वाहतूक पोलिसांनी आणलेल्या या नविन ॲपची माहिती वाहतूक पोलिसांच्या सोशल मिडीया अकाऊंटवर देण्यात आली आहे. या माहितीनुसार, पोलिसांनी ई तक्रारींसाठी mahatraffic या ॲपची सोय केली आहे.

महाट्रॅफिक ॲपच्या माध्यमातून चालक आपल्या सर्व तक्रारी दाखल करु शकतो. हे ॲप फोनमध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये आपली माहिती भरावी. यानंतर ॲपमध्ये grievance या टॅबवर क्लिक करुन नागरिकांनी आपल्या सर्व तक्रारी दाखल कराव्यात. तसेच या ॲपवर तक्रारी दाखल करायच्या नसतील तर नागरिक @puneetrafiicpolice या ट्विटर खात्यावर ही तक्रारी दाखल करु शकतात.

या व्यतिरिक्त 8411800100 या व्हॉट्सअँप क्रमांकावर चालक आपली तक्रार नोंदवू शकतात. या तक्रारींची दखल लवकरात लवकर घेतली जाणार असल्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे. अनेकवेळा सीसीटीव्हीच्या आधारे वाहतूकीचे नियम मोडणाऱ्या चालकांवर ई-चलन पद्धतीद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते.

परंतु या कारवाईत जास्तच प्रमाणात दंड आकारला जातो. त्यामुळे यावर काही तरी मार्ग काढण्यासाठी पोलिसांनी mahatraffic ॲप आणले आहे. या ॲपचा सर्वांनी वापर करावा आणि वाहतूकीचे नियम पाळावेत असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या
…तर राज्यातील माजी मंत्र्यांची सुरक्षा काढा, रोहित पवारांची गृहमंत्र्यांकडे मागणी
रशियाला तोंड देता देता नाकीनऊ आले असतानाच युक्रेनवर आणखी एक देश करणार हल्ला; अख्ख जग टेंशनमध्ये
पाकिस्तानचा खेळ संपला? आंतरराष्ट्रीय समुदाय निर्णायक कारवाईच्या तयारीत
२४ वर्षीय पायलट महाश्वेताची कौतूकास्पद कामगिरी, युक्रेनमधून ८०० भारतीय विद्यार्थ्यांना आणले भारतात