बंगळूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३९ वर्षीय महिलेने एका पोलीस निरीक्षकाविरुद्ध लैंगिक छळाचा आरोप केला आहे. ‘एकतर लाच दे किंवा शारिरीक संबंध ठेव’ अशी मागणी आरोपी पोलीस निरीक्षकाने त्या पीडित महिलेकडे केली होती. या प्रकरणात पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. (police-inspector-shocking-demand-women-in-banglore-5-lakhs-give-me)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बंगळूर पोलीस आयुक्त कमल पंत यांच्याकडे एका महिलेने तक्रार केली आहे. त्या तक्रारीत महिलेने बंगळूरमधील हेन्नूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसंत कुमार यांच्यावर आरोप केले आहेत. पोलीस निरीक्षक वसंत कुमार यांनी त्या महिलेकडे लाच देण्याची किंवा शारीरिक संबंध ठवण्याची मागणी केली होती.
पीडित महिलेने दिलेल्या माहितीनुसार, भाडेकरू आणि त्याच्या कुटूंबियांनी त्या महिलेवर हल्ला केला होता. १३ जानेवारी रोजी ती महिला या भाडेकरूविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी हेन्नूर पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक वसंत कुमार यांनी त्या महिलेची तक्रार नोंदवली नाही. उलट त्या महिलेच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला.
पीडित महिलेने आरोप केला आहे की, पोलीस निरीक्षक वसंत कुमार मला म्हणाले की, एकतर ५ लाख रुपये द्या किंवा शारिरीक संबंध ठेवा. मी केलेल्या मागण्या मान्य असतील तर मी तुमची मदत करेन. पीडित महिलेने यावर विरोध दर्शवला व पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ केली. यानंतर पोलीस निरीक्षक वसंत कुमारने त्या महिलेला तक्रार दाखल करण्याची धमकी दिली.
पोलीस निरीक्षक वसंत कुमारने त्या पीडित महिलेच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. त्या प्रकरणातून महिलेला मोठ्या कष्टाने जामीन मिळाला. त्या पीडित महिलेने तक्रारीत म्हंटले आहे की, जामीन मिळाल्यानंतर आरोपी पोलीस निरीक्षकाने मला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले. तो मला त्याच्या केबिनमध्ये घेऊन जायचा आणि त्याचा प्रस्ताव स्विकारायला भाग पाडायचा.
पोलीस निरीक्षक मला त्याचा प्रस्ताव स्विकारण्यासाठी दबाव आणायचा. मला खूप काळ त्याचा हा त्रास सहन करावा लागला, असे त्या महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे. या घटनेची संपूर्ण परिसरात चर्चा होत आहे. या घटनेमुळे महिलांना सुरक्षा देणारे पोलिसच महिलांशी गैरवर्तन करत असल्याचे समोर आले आहे.
महत्वाच्या बातम्या :-
‘ही’ उदाहरणे देत शरद पवारांचा कोल्हेंना जाहीर पाठींबा; नथूरामच्या भूमिकेचे केले समर्थन
धक्कादायक! व्हॉट्सऍप मेसेज फॉरवर्ड करणं पडलं महागात, महिलेला दिली थेट मृत्युदंडाची शिक्षा
‘मला तू खुप आवडते, फक्त एक रात्र…’, पोलिस निरीक्षकाची महिला कॉन्स्टेबलला विचित्र मागणी