police gives the keys to shivsena workers | जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडली आहे, तेव्हापासून राज्यात शिंदे गट आणि ठाकरे गट असे दोन गट पडले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचेही दोन गट पडले आहे. मनोरमा नगर येथे शाखा ताब्यात घेण्यावर शिंदे गटाचे कायकर्ते आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्ते समोरासमोर आले होते. त्यानंतर आणखी एका नव्या वादाला तोंड फुटले आहे.
शुक्रवारी आनंद नगर कोपरी या भागात पुन्हा शिवसेना शाखा ताब्यात घेण्यावरुन शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांसमोर आले आहे. या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवरुन हा वाद सुरु झाला आहे. रात्रीपासून या शाखेसमोर गर्दी होती. त्यानंतर सकाळी या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
तसेच इथे वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी त्या शाखेच्या ठिकाणी तातडीने धाव घेतली होती. त्यानंतर त्यांनी त्या शाखेचे कुलूप उघडून त्या शाखेचा ताबा घेतला.
यावेळी बोलताना नरेश मस्के म्हणाले की, शाखा शिवसेनेचीच आहे. सर्व कार्यकर्तेही शिवसेनेचेच आहे. ज्यांना वाटतं त्यांनी इथे यावं बसावं आणि काम करावं. शाखेवर कोणीही हक्क सांगू नये. तसेच ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी देखील या ठिकाणी धाव घेतली होती.
केदार दिघे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाचे कार्यकर्ते घोषणाबाजी करताना दिसून येत होते. हा वाद वाढतच चालला होता. त्यामुळे तिथे पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. पण कार्यकर्ते त्या ठिकाणाहून हटण्यासाठी तयार नव्हते. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना शाखेची चावी देऊन शांत केले आहे.
कोपरी पाचपाखडी येथे हा वाद झाला. हा मतदार संघ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. पण त्यांच्या मतदार संघातही दोन्ही गटाचे कार्यकर्ते आहे. त्यामुळे शाखेवरुन वाद झाला आहे. आता सध्या हा वाद शांत झाला असला तरी पुढे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचा सत्तांतराचा गौप्यस्फोट शिंदे गटाने फेटाळला, केसरकरांनी केला मोठा खुलासा
Devendra Fadnavis : उद्धवजी, तुमचे त्यांच्याशी पटत नसेल, तुमच्यात निराशा असेल, पण..; फडणवीसांचे ठाकरेंना कळकळीचे आवाहन
Team India: …तर संजू सॅमसनने नक्कीच मॅच जिंकून दिली असती, वाचा शेवटच्या ओव्हरमध्ये नक्की काय घडलं?






