औरंगाबाद शहरात तब्बल एक हजाराच्या जवळपास गणेश मंडळ आहेत. गणेशोत्सव दरम्यान गणेश मंडळांना परवानगी घेताना कुठलीही अडचण येऊ नये तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस विभाग गणेश मंडळाना सुचणा देण्यासाठी दरवर्षी पोलीस आयुक्तालायच्या वतीने एक बैठक घेण्यात येते.
विशेष बाब म्हणजे या बैठकीत शहरातील सर्व ताजकीय पक्षतील नेते, आजी-माजी लोकप्रतिनिधी आमंत्रित केले जाते. मात्र यंदाच्या या बैठकीदरम्यान, नेत्यांच्या रुसवे फुगव्याची चर्चा राज्यात पसरली आहे. सध्या मुळ शिवसेना आणि शिंदे शिवसेना गट यांच्या वाद सुरू आहे.
या वादाचे पडसाद पोलीस आयुक्तालयांकडून गणेश उत्सवानिमित्त आयोजित समन्वय बैठकीत पडले. त्याचं झालं असं की, या कार्यक्रमात खासदार इम्तियाज जलील यांच्या नंतर शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे स्वागतासाठी नाव पुकारण्यात आले.
मात्र खैरेंचे नाव ऐकताच शिंदे गटात सामील झालेले आमदार संजय शिरसाट प्रचंड संतापले. शिरसाट यांनी खुर्चीवरून उठून आपली नाराजी जाहीर कार्यक्रमात व्यक्त केली. प्रोटोकॉल नुसार माझा सत्कार खैरे यांच्या अगोदर करायला हवा असे शिरसाट यांनी म्हंटले.
दरम्यान, संतापलेल्या शिरसाट यांनी टेजवरून खाली जाण्याचा प्रयत्न केला. मात्र तेवढ्यात बाजूला बसलेले खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांची समजूत काढत त्यांचा हात धरत खाली बसविले. सध्या या घटनेची राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
Jharkhand : आता झारखंडमध्येही काय झाडी काय डोंगर! मुख्यमंत्र्यांसह ३६ आमदार झाले नॉट रीचेबल
Shivsena : झंडूबाम घेऊन ठेवा कारण तुमची.., शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचा भाजपला इशारा
शिवसेनेतील दोन आमदार शिंदे गटाच्या गळाला; ‘या’ मंत्र्याच्या दाव्याने मोठी खळबळ
रात्रीच्या बैठका घेतात, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, संभाजीराजेंविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक