पिंपरीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुन्हा केलेला नसून चक्क एका पोलिस कर्मचाऱ्याने खंडणीसाठी एकाचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. यामुळे आता न्याय कोणाकडे मागायचा? असा सवाल उपस्थित झाला आहे. (police employee kidnap a person for 300 crore crypto currency and 8 lakh)
दिलीप तुकाराम खंदारे हा पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात मुख्यालय येथे कार्यरत आहे. या अगोदर तो पुणे पोलीस आयुक्तालयात सायबर क्राईमला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाण्यात 14 जानेवारी रोजी विनय नावाच्या व्यक्तीचे अपहरण झाल्याची तक्रार करण्यात आली होती.
त्यानंतर या तपासासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली २ पथकं तयार करण्यात आली. मात्र तपासादरम्यान वेगळीच माहिती समोर आली. दिलीप तुकाराम खंदारे यांनी ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांचा हव्यासपोटी प्रदीप काशिनाथ काटे यांच्यासह मिळून आरोपी पोलीस कर्मचारी खंदारेने विनयचं अपहरण केल्याची माहिती समोर आली.
तसेच पोलिस आपल्या मागावर असल्याचे लक्षात येताच आरोपींनी अपहरण केलेल्या विनय नावाच्या व्यक्तीला सोडून दिलं. आणि त्यानंतर ३०० कोटींच्या क्रिप्टो करन्सी आणि ८ लाखांचा खंडणीसाठी त्यांचं अपहरण केल्याचं विनय यांनी पोलिसांना सांगितलं. तसेच या व्यक्तीला अलिबाग येथे डांबून ठेवण्यात आलं होतं.
तसेच आता या गुन्ह्यातील आरोपी सुनील राम शिंदे, वसंत श्याम चव्हाण, फ्रान्सिस टिमोटी डिसुझा, मयूर महेंद्र शिर्के, यांना ताब्यात घेतलं. तसेच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अन पोलीस कर्मचारी दिलीप तुकाराम खंदारे आणि प्रदीप काशीनाथ काटे यांच्या सांगण्यावरून विनयचं अपहरण केल्याचं तपासात पुढं आले. त्यानुसार, दोघांना अटक केली.
दरम्यान, या प्रकरणात आणखी काही व्यक्तींची नावे पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सध्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानेच असे कृत्य केल्याने सर्वांचा धक्का बसला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
दादागिरी आली अंगलट! पोलिसांसोबत हुज्जत घालणाऱ्या निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल
‘भाजपवाले गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप करत’ उत्तर प्रदेशचे मोदी लढणार निवडणूक
पत्नी, सासू, सासरे, मेहुणी, मेहुणा सगळ्यांना झोपेत जिवंत जाळलं, न्यायालयाने पतीला दिली कठोर शिक्षा
पत्नी, सासू, सासरे, मेहुणी, मेहुणा सगळ्यांना झोपेत जिवंत जाळलं, न्यायालयाने पतीला दिली कठोर शिक्षा