पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे धडाकेबाज पोलीस आयुक्त, “आयर्नमन”, अशी आयपीएस कृष्ण प्रकाश यांची ओळख आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तपदी कार्यरत असताना जमीन खरेदी विक्री प्रकरणी कृष्ण प्रकाश यांच्यासाठी २०० कोटी पेक्षा अधिक रक्कम गोळा केल्याचा दावा एका पत्रातून करण्यात आला आहे. हे पत्र थेट मुख्यमंत्र्यांनाच पाठविण्यात आले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक अशोक डोंगरे यांनी संबंधित पत्र लिहिलं असल्याचं पत्रावरील मजुरातून स्पष्ट होत आहे. कारण, डोंगरे यांचं अर्जदार म्हणून या पत्रावर नाव आहे. मात्र, हे पत्र आपण लिहिलं नाही, असा दावा डोंगरे यांनी केला आहे. पण काही वेळातच हे पत्र बनावट असल्याचा खुलासा स्वत: डोंगरे यांनी केला. त्यानंतर स्वतः कृष्णप्रकाश यांनीही हे पत्र केवळ बदनामीसाठी व्हायरल केल्याचे स्पष्ट केले. या संपुर्ण घडामोडींनातर आयपीएस कृष्णप्रकाश यांची विशेष पोलीस महानिरीक्षक व्ही.आय.पी .सुरक्षा, मुंबई येथे नियुक्ती करण्यात आली.
नुकतीच आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांच्या एकूण संपत्तीची यादी उघड झाली आहे त्यानुसार स्वतःच्या, पत्नीच्या, भावाच्या तसेच आई-वडिलांच्या नावे शेकडो एकर जमीन,घरे, झारखंड आणि महाराष्ट्रात राज्यात आहेत.
• झारखंड, हजारीबाग – घर – वडिलांच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग – शेत जमीन – वडिलांच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग – २९ एकर जमीन – परंपरागत – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड हजारीबाग – ३.७९ एकर जमीन – आईच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड हजारीबाग – शेत जमीन – (सध्याची किंमत ३० लाख रुपये)
• झारखंड, हजारीबाग, कोरंबे – ४९ एकर जमीन – परंपरागत – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग, कोरंबे – ४.५ एकर जमीन – वडिलांच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग, कोरंबे – ७ एकर जमीन – स्वतः आणि भावाच्या भागीदारीत – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग, कोरंबे – ८ एकर जमीन – स्वतः आणि भावाच्या भागीदारीत – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग, कोरंबे – ११ एकर जमीन – स्वतः आणि भावाच्या भागीदारीत – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• झारखंड, हजारीबाग, कोरंबे – २१ एकर जमीन – स्वतः आणि भावाच्या भागीदारीत – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
महाराष्ट्रात जमीन आणि ३ फ्लॅट
• महाराष्ट्र, सांगली, कुपवाड – ४.४५ गुंठे जमीन – पत्नीच्या नावे (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• महाराष्ट्र, पुणे, पुरंदर, मौजे कुंभोशी गाव – २ एकर जमीन – पत्नीच्या नावे (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• महाराष्ट्र, पुणे, बाणेर गांव – जमीन – पत्नीच्या नावे – (सध्याची किंमत १ कोटी २० लाख)
• महाराष्ट्र, पुणे, अमॅनोरा पार्क – फ्लॅट – पत्नीच्या नावे – (सध्याची किंमत १ कोटी १४ लाख)
• महाराष्ट्र, पुणे, धायरी – ४ गुंठे जमीन – स्वतःच्या नावे – (सध्याची किंमत ५ लाख रुपये)
• महाराष्ट्र, पुणे, लोहगाव – २ हजार चौरस फुटाचा फ्लॅट – स्वतःच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• महाराष्ट्र, मुंबई, अंधेरी – फ्लॅट – स्वतःच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• महाराष्ट्र, अहमदनगर, राहता खूर्द – ०.८० गुंठे जमीन – स्वतःच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• महाराष्ट्र, अहमदनगर, राहता खूर्द – जमीन – पत्नीच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
• महाराष्ट्र, औरंगाबाद, गंगापूर, दहेगाव – जमीन – स्वतःच्या नावे – (बाजारभावानुसार सध्याची किंमत नमूद नाही)
(माहिती संदर्भ : अधिकाऱ्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेले संपत्तीचे विवरण)
महत्वाच्या बातम्या
“IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली?”, लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
विमानतळावर IPS अधिकाऱ्याच्या बॅगेतून निघाल्या वाटाण्याच्या शेंगा; लोकं म्हणाले, ‘वाटाणा स्मगलिंग सुरू आहे’
VIDEO: लहान भावाला वाचवण्यासाठी मोठ्या भावाने दाखवले धाडस; IPS म्हणाले, ‘भाऊ असावा तर असा’
खुपच डॅशिंग आणि सुंदर आहे ‘ही’ महिला IPS; तिची झलक पाहून दिग्दर्शकाने दिली होती चित्रपटात काम करण्याची ऑफर