Share

पत्नीला परपुरुषांसोबत संबंध ठेवण्यास पाडायचा भाग; पोलिसांना पतीनं सांगितलं धक्कादायक कारण

crime

आपल्या आजूबाजूला दररोज धक्कादायक घटना घडल्याच्या बातम्या वारंवार आपल्या कानी पडतात. खून, दरोडा, अपहरण, अशा प्रकारच्या अनेक बातम्या आपल्या कानावर पडत असतात. मात्र आता आणखी एक सेक्स रॅकेटविषयीची बातमी समोर आली आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सेक्स रॅकेटची अनेक प्रकरणे समोर येत आहे.

गुन्हेगारांनी हॉटेल्स, मसाज पार्लरला सेक्स रॅकेटचा अड्डा बनवला आहे. अशातच बिहारची राजधानी पाटणा येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. स्वतःच्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या पतीला बेड्या ठोकल्या आहे. त्याने चौकशीदरम्यान खळबळजनक खुलासा देखील केले आहेत.

तर वाचा नेमकं प्रकरण काय? ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथील आहे. पाटणा विमानतळ पोलीस स्टेशन हद्दीतील सिद्धार्थ कॉलनीतील एका अपार्टमेंट फ्लॅटमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. सुमारे दोन वर्षांपासून भाड्याच्या फ्लॅटमध्ये हे सगळं सुरू असल्यातं पोलिसांना माहिती मिळाली.

तात्काळ पोलिसांनी छापा टाकून या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या मुख्य आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. तसेच पोलिसांनी सोबतच यात अडकलेल्या महिलांचीही सुटकाही केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली.

चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितलं की, तो स्वतःच्या पत्नीकडून वेश्याव्यवसाय करून घेत असे. तो आपल्या पत्नीला जबरदस्तीने इतर पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडायचा. धक्कादायक बाब म्हणजे यासाठी तो स्वत: ग्राहकांची बुकिंग करायचा. धनंजय कुमार असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘वेश्याव्यवसायातून मिळणारे पैसे स्वतःकडे ठेवायचा. वेश्याव्यवसायाच्या बदल्यात मिळालेल्या पैशातून तो आपलं कुटुंब चालवत असे.’ दरम्यान, चौकशीदरम्यान पीडितेने सांगितलं की, एका महिन्यात 25 दिवस तिच्यावर अत्याचार झाले. दररोज रात्री किमान दोन ग्राहक त्यांचं लैंगिक शोषण करायचे.

महत्त्वाच्या बातम्या
बीड हादरलं! मंदिरात पूजा सुरू असताना पुजाऱ्याला दिला भयंकर मृत्यू, तरुणाने सपासप वार करत पाडला रक्ताचा सडा
500 कोटींचा भ्रष्टाचार? शिवसेना नेत्याच्या तक्रारीवरून राष्ट्रवादीच्या आमदारावर ईडीची मोठी कारवाई
हटके आहे RRR च्या राजामौलींची लव्हस्टोरी, घटस्फोटीत एका मुलाच्या आईसोबत केलं आहे लग्न
राज ठाकरेंच्या टीकेला सेनेच्या ढाण्या वाघाने दिलं सणसणीत प्रत्युत्तर; म्हणाले “अक्कलदाढ उशिरा…”

इतर क्राईम ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now