धक्कादायक प्रकरणांची मालिका काही केल्या थांबण्याच नाव घेतं नाहीये. बलात्कार, अत्याचार, महिलांवरील अन्याय अशा अनेक घटना आपल्या आजूबाजूला घडतं आहे. अशातच मध्य प्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
खासगी शाळेच्या स्कूल बसचालकाने महिला अटेंडेंटच्या समोरच तीन वर्षीय मुलीवर बलात्कार केला. या धक्कादायक घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भयानक बाब म्हणजे, या घटनेनंतर अटेंडेंट आणि चालकाने संगनमताने घटना उघड होऊ नये यासाठी पीडित मुलीचे कपडे बदलले, असल्याची माहिती मिळत आहे.
ही धक्कादायक बातमी गुरुवारी घडली. ही घृणास्पद घटना भोपाळमधील (Bhopal) प्रमुख असलेल्या इंटरनॅशनल शाळेत घडली असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी तात्काळ पोलिसात तक्रार केली. सध्या या नराधमाला अटक करण्यात आली आहे.
सोबतच महिला अटेंडटला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा चालक 32 वर्षीय असून धक्कादायक बाब म्हणजे स्वत: दोन मुलींचा बाप आहे. याचबरोबर तीन महिन्यापूर्वीच त्याने या शाळेत बस चालक म्हणून नोकरी मिळवली होती.
आता या प्रकरणी आणखी एक माहिती समोर येतं आहे. प्रशासनाकडून बलात्कार करणाऱ्या बस ड्रायव्हरच्या राहत्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्व विभाग, पोलीस विभाग आणि नगरपालिकेनं संयुक्त कारवाई करत आरोपीचं घर पाडलं आहे.
तर आता सर्व शालेय बसेसमध्ये महिला स्टाफ असणं बंधनकारक असण्याबद्दल जिल्हाधिकारी अविनाश लवानिया यांनी एसडीएम आणि डीईओ यांना आदेश दिले आहेत. याशिवाय बसमध्ये रेकॉर्डिंग कॅमेरा असणंही अनिवार्य करण्यात आलं आहे. सध्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
भाजपचा बडा नेता पवारांच्या भेटीसाठी थेट ‘सिल्व्हर ओक’वर; वाचा नेमकं बंद दाराआडं काय घडलं?
CM शिंदेंच्या हस्ते सरन्यायाधीशांचा सत्कार झाल्याने वाद; उज्ज्वल निकम म्हणाले, आत्तापर्यंतच्या प्रघातानुसार..
धावत्या कारने महामार्गावर घेतला पेट, भरपावसात गाडीतून CM शिंदे उतरले, म्हणाले, ‘गाडी आपण नवी घेऊ, काळजी करू नकोस’
प्रभादेवीतील वाद चिघळणार? शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांविरोधात पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, वाचा नेमकं काय घडलं?






