करेल तर तुझ्याशीच लग्न नाहीतर कोणाशीच नाही, अशा जीवणमरणाच्या शपथा आपण अनेक वेळा प्रेमी जोडप्यांकडून ऐकत असतो. अशीच शपथ एका तरुणाने आपल्या प्रियसीला दिली. घरच्यांना अमान्य असून तिच्यासोबत लग्न केले. मात्र, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी त्याच्या प्रियसीनं लग्न अमान्य केले. याचे दुःख तिच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तरुणाला सहन झाले नाही आणि त्याने विषप्राशन केलं.
दीपक राजेंद्र टिळवणे असे 23 वर्षीय तरुणाचे नाव असून, त्याचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका 20 वर्षीय तरुणीवर प्रेम जडलं. या तरुणीचे नाव गायत्री आहे. प्रेमात पडल्यानंतर दोघांनी एकमेकांना लग्नाच्या शपथा घातलेल्या होत्या. मात्र, दिपकच्या आई वडिलांनी त्याचे लग्न इतर ठिकाणी जमवलं.
याबद्दल प्रियसी गायत्री ला समजताच तिने दिपकच्या घरी धाव घेतली. दिपकला लग्नाच्या शपथा आणि वचन याची आठवण करून दिली. दिपकच लग्न दुसऱ्या ठिकाणी होणार या विचाराने ती पूर्ण बिथरली होती. त्यामुळे दिपकच्या घरच्यांना तिने दीपक आणि तिच्या मध्ये असलेल्या प्रेम संबंधाबाबत सांगितले. आम्ही एकमेकांना सोडून जगू शकत नाही, त्यामुळे दिपकच दुसऱ्या ठिकाणी जमलेलं लग्न मोडण्यास सांगितलं.
त्यांनतर, दिपकने देखील आपल्या आई वडिलांना आपल्या प्रेमाबद्दल सांगितलं. त्यानं गायत्री सोबत लग्न करण्याची आई वडिलांपुढे गळ घातली. मात्र, दिपकच्या घरच्यांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनतर दीपक अणि गायत्री यांनी स्वतःच्या आयुष्याचा विचात केला आणि निर्णय घेतला.
त्या घटनेच्या रात्री दीपक आणि गायत्री यांनी घरच्यांचा विरोध झुगारून हिंदू विवाह पद्धतीने शहरातील एका मंदिरात जाऊन विवाह ही उरकून घेतला. विवाहानंतर गायत्री हिने आपण सज्ञान असल्याचे सांगत आपण स्वतःच्या मर्जीने दीपक सोबत विवाह करत असल्याचा बॉण्ड पेपर वर करारनामाही लिहून दिला.
लग्नानंतर दीपक आणि गायत्री रात्री दिपकच्या घरी गेले. घरच्यांनी दीपकचे लग्न मान्य करत मुलाच्या इच्छापूर्तीसाठी या लग्नास मान्यता देत गायत्रीचा रूढी, प्रथांप्रमाणे विधिवत तिचा स्वीकार ही केला. दिपकच्या घरच्यांनी गायत्रीला मान्य केल्यामुळे गायत्री आणि दीपक दोघेही खुश होते.
मात्र, लग्नाला जेमतेम काही तास झाले असताना, गायत्रीच्या नातेवाईकांनी गायत्रीला घरी नेलं. गायत्रीला घेऊन जाताना त्यांनी सांगितले की, तुमचं आमच्या पद्धतीने पुन्हा सकाळी लग्न लावून देतो. यावर गायत्री त्यांच्यासोबत गेली. मात्र, ठरलेल्या प्रमाणे सकाळी गायत्रीच्या घरच्यांनी तिचे लग्न दीपकसोबत लावण्यास नकार दिला. जालना पोलिसांनी दीपक आणि त्यांच्या कुटूंबियांना बोलावून घेत हे लग्न गायत्रीला मान्य नसल्याचे सांगत तिचा नांदण्यास नकार असल्याचे सांगितले, याचा दीपक आणि त्यांच्या कुटूंबियांना धक्काच बसला.
गायत्रीवर दबाव टाकून तिच्या नातेवाईकांनी हा प्रकार घडवून आणला असं दिपकने पोलिसांना सांगितलं. मात्र, यावर गायत्री ही सज्ञान आहे, तिला तिचा निर्णय घेता येतो, तिने स्वतः लग्नाला नकार दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. दीपकला गायत्रीची गोष्ट सहन झाली नाही. त्याने थेट घर गाठलं आणि विषारी औषध प्राशन केलं. दीपकने विष प्राशन केल्याचे कळताच त्याच्या आईवडिलांनी त्याला उपचारासाठी जालना हॉस्पिटल मध्ये दाखल केले,सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
महत्वाच्या बातम्या
निलेश लंकेंना पारनेरकरांचा दे धक्का! नगर पंचायतीत बहूमत मिळण्यापासून रोखले
मृत्युुच्या आधी आजोबांनी असा कानमंत्र दिला की नातू झाला थेट कलेक्टर, वाचा यशोगाथा
कौतुकास्पद! बहिणीने टेलरिंगचे काम करून भावाला शिकवले, भावाने कलेक्टर होऊन नाव कमावले