Share

अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फोटो; राजकारण तापलं

narendra modi

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात. त्यांच्या सभा असो किंवा त्यांच्या दौरे असो पंतप्रधान मोदी नेहमीच चर्चेत असतात. विशेष बाब म्हणजे त्यांचे पोशाख. मोदींचे अनेक फोटो, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतं असतात.

सध्या पंतप्रधान मोदींचे असेच काही फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहेत. मात्र यावरून राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..? नेहमीच चर्चेत असणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा एका वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आले आहेत. अरब देशातील कचराकुंड्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो लावण्यात आले आहेत. कतारच्या परराष्ट्रमंत्रालयाने दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांना याबाबत माहिती दिली.

काही दिवसांपूर्वीच भाजप नेत्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. हा वाद ताजा असताना अरब देशातील कचराकुंडीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. यावरून आता राजकारण देखील रंगण्यास सुरुवात झाली आहे.

दरम्यान, काँग्रेसने यासंदर्भात ट्वीट करत अरब देशांच्या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. कॉँग्रेस नेते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्वीट केला आहे. आम्ही मोदी आणि भाजपला या देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच पण आमचा मोदी विरोध या देशात आहे. मात्र, कचराकुंडीवर आमच्या पंतप्रधानाचा फोटो लावणं, हे आम्हाला स्वीकार नसल्याचं त्यांनी म्हटलंय.’

पुढे ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे की, ‘मोदींना आमचा विरोध देशात आहे, मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्विकार होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी, असे ट्विट राजपूत यांनी केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
RCB कडून खेळताना 4 सामन्यांत बनवले 18 रन, इंग्लंडमध्ये जाताच केली 75 धावांची तुफान खेळी
‘उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तर मी मुख्यमंत्री होणार; शिवसेना मंत्र्याच्या विधानाने खळबळ’
“मोदी सरकार शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान करते अन् दोन हजार देत त्यांना खुश करते”
नाटकात अशोक मामांसोबत घडला होता ‘हा’ भयानक प्रकार, तरी सुरु ठेवली तालीम; चिन्मयने सांगितला किस्सा
इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now