भारतीय सिनेसृष्टीतील दिग्गज गायिका लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रूग्णालयात उपचार सुरु होते. तर उपचारादरम्यान आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीसोबत संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपला दुःख व्यक्त करत सोशल मीडियाद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली (PM Narendra Modi On Lata Mangeshkar Death )आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत लिहिले की, ‘माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत. दयाळू आणि काळजीवाहू व्यक्तिमत्व असणाऱ्या लता दीदी आपल्याला सोडून गेल्या. त्यांच्या जाण्याने देशात निर्माण झालेली पोकळी कधीच भरून निघणार नाही. येणाऱ्या पिढ्या त्यांना भारतीय संस्कृतीतील एक दिग्गज म्हणून कायम स्मरणात ठेवतील. त्यांच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची त्यांच्यात अतुलनीय क्षमता होती’.
https://twitter.com/narendramodi/status/1490180741195780096?s=20&t=KswKVvSd5bVJKPz2HGc4wQ
पुढच्या ट्विटमध्ये मोदी यांनी लिहिले की, ‘लता दीदी यांच्या गाण्यांत वैविध्यपूर्ण भावना असायच्या. त्यांनी भारतीय सिनेसृष्टीतील अनेक स्थित्यंतरे जवळून पाहिल्या आहेत. चित्रपटांच्या पलीकडेही त्यांनी नेहमीच भारताच्या प्रगतीबद्दल विचार केला आहे. त्यांना नेहमी एक मजबूत आणि विकसित भारत पाहायचे होते’.
Lata Didi’s songs brought out a variety of emotions. She closely witnessed the transitions of the Indian film world for decades. Beyond films, she was always passionate about India’s growth. She always wanted to see a strong and developed India. pic.twitter.com/N0chZbBcX6
— Narendra Modi (@narendramodi) February 6, 2022
दरम्यान, लता मंगेशकर यांनी भारतीय सिनेसृष्टीतील त्यांच्या दीर्घकालीन करिअरमध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये जवळपास ३० हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. आपल्या मधुर गायनाद्वारे त्यांनी नेहमीच लोकांकडून प्रेम मिळवले आहे.
संगीत क्षेत्रातील गानसम्राज्ञी म्हणून लता मंगेशकर यांना ओळखले जाते. भारत सरकारने त्यांच्या कार्यासाठी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ देऊन त्यांचा सन्मान केला. तसेच ‘पद्म भूषण’, ‘पद्म विभूषण’ आणि ‘दादा साहेब फाळके’ पुरस्कार देऊनही त्यांचे सन्मान करण्यात आले आहे.