Share

वेदांताचा प्रकल्प गुजरातने पळवल्यानंतर अखेर पंतप्रधान मोदींनी दिली पहीली प्रतिक्रीया; म्हणाले…

narendra-modi-

एकीकडे वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदींनी वेदांता ग्रुप फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातमध्ये होणार असल्याबद्दल राज्य सरकारचं अभिनंदन केलं आहे.

यामुळे आता हा वाद आणखीच चिघळणार असल्याचं बोललं जातं आहे. मंगळवारी वेदांता फॉक्सकॉनचा (Vedanta Foxconn) पुण्यात होऊ घातलेला प्रकल्प अचानक गुजरातला स्थलांतरीत होत असल्याचं वृत्त समोर आलं. आणि राज्याच राजकारण तापलं. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका होऊ लागली.

त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी याबद्दल नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्याची देखील माहिती समोर आली आहे.  एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदींना विनंती केली आहे की, ‘महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा.’  यामुळे आता पुन्हा महाराष्ट्रात फॉक्सकॉन प्रकल्प येणार का? याकडे लक्ष लागलेले असतानाच मोदींनी यावर भाष्य केलं आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत राज्य सरकारचे कौतुक देखील केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्विटकरत म्हंटलं आहे की, सेमी कंडक्टर निर्मितीच्या या प्रकल्पाचा सामंजस्य करार हे मोठं पाऊल आहे. यामुळं अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल. यासोबतच रोजगार निर्मितीला बळ मिळेल. विशेष बाब म्हणजे याद्वारे १. ५४ लाख कोटी रुयपांची गुंतवणूक होईल.’

दरम्यान, वेदांता फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रात येणारं हे ९५ टक्के ठरलं होतं. महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पावर ९० टक्के चर्चाही केली होती. याचबरोबर फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता.

विशेष बाब म्हणजे तब्बल या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. मात्र राज्यात सत्तांतर झाले अन् हा प्रकल्प गुजरातला नेण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला. यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे. आखरे यावर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केलेलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंना धक्क्यावर धक्के..! माजी आमदारासह तब्बल ५० पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now