गेल्या काही काळापासून मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक मोदी सरकारवर निशाणा साधत आहेत. मग तो काश्मीर प्रश्न असो किंवा शेतकऱ्यांची समस्या असो. पुन्हा एकदा मलिक यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी लष्कर भरतीसाठी ‘अग्निपथ’ योजना जाहीर केली आहे.
याचाच धागा पकडत राज्यपाल सत्यपाल मलिक थेट मोदी सरकारला लक्ष केलं आहे. काही दिवसांपासून सत्यपाल हे सातत्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष करत आहेत. पुन्हा एकदा त्यांनी माध्यमांशी बोलताना मोदींना लक्ष केलं आहे. ‘मी कोणाच्याही दबावाखाली काम करत नसल्याच,’ त्यांनी ठणकावून सांगितलं आहे.
याबाबत माध्यमांशी बोलताना अग्निपथ योजनेबाबत सत्यपाल मलिक यांनी म्हंटलं आहे की, ‘असंतुष्ट मुलं सैन्यात गेली तर त्यांच्या हातात रायफल असेल, मग ती बंदुक कोणत्या दिशेला वळू शकेल याची कोणीच कल्पना करू शकत नाही. यामुळे वाईट घटना घडण्याआधीच बॅकफूटवर येऊन योग्य निर्णय घ्या.”
पुढे बोलताना राज्यपाल मलिक यांनी म्हंटलं आहे की, “याबाबत मी पहिल्यांदा बोललो तेव्हापासून माझ्या खिशात राजीनामा आहे. मोदींकडून संकेत आले की, त्याच दिवशी मी माझा निर्णय घेईन. मात्र असे म्हणा की मला तुमच्याबरोबर काम करणे अस्वस्थ वाटते. मी त्याच दिवशी पदाचा राजीनामा देखील. असं त्यांनी स्पष्टच सांगितलं.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांनी मोदींना लक्ष केले होते. भाजप सरकारने आपल्याला अध्यक्षपदाचं आमिष दाखवलं, असं म्हणत मलिक यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला होता. हरियाणाच्या जिंदमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले होते. यावेळी बोलताना मलिक यांनी मोदी सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला.
महत्वाच्या बातम्या :-
“आमदारांना अगोदर डुक्कर,गद्दार अशी विशेषणे लावायची आणि मग…”, मनसेचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
शिवसेनेच्या आंदोलनात लहान मुलांना पाहून भाजपने लगावला टोला, म्हणाले, शिल्लक सेनेकडे…
तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ.., पत्नीच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदेंची खास पोस्ट
आमदारांपाठोपाठ खासदारांचाही उद्धव ठाकरेंना धक्का, उचललं मोठं पाऊल, शिवसेनेचं काय होणार?