Share

बप्पी लहरींच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केलं दुःख; ट्विट करत म्हणाले..

PM Modi On Bappi Lahiri Death

बॉलिवूडचे दिग्गज गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri) यांचे निधन झाले आहे. मंगळवारी रात्री त्यांनी मुंबईच्या एका रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली असून अनेकजण त्यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला (PM Modi On Bappi Lahiri Death)आहे.

बप्पी लहरी यांच्या निधनावर मोदी यांनी ट्विट करत लिहिले की, ‘बप्पी लहरी यांचे संगीत सर्वसमावेशक आणि विविध भावना सुंदररित्या व्यक्त करणारे असे होते. त्यांचा आनंदी स्वभाव प्रत्येकाच्या आठवणीत राहिल. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती’.

बप्पी लहरी यांच्या निधनावर इतर राजकीय मंडळींनीही ट्विट करत आपला शोक व्यक्त केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत लिहिले की, ‘दिग्गज गायक आणि संगीतकार बप्पी लाहिरीजी यांच्या निधनाबद्धल ऐकून दुःख झाले. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत जगतात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बप्पी दा त्यांच्या अष्टपैलू गायनासाठी आणि आनंदी स्वभावासाठी कायम लक्षात राहतील. त्यांच्या कुटुंबीयांना आणि चाहत्यांना माझ्या संवेदना. ओम शांती’.

केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बप्पी लहरी यांच्या निधनावर शोक व्यक्त करत लिहिले की, ‘सुप्रसिद्ध संगीतकार बप्पी लहरी यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांनी अनेक गीतांना आपल्या संगीताने सजवले. संगीतातील अनेक बारीक गोष्टी त्यांना माहित होत्या. बप्पी दा सामाजिक घडामोडींबद्दलही नेहमी जागरूक होते. दुःखाच्या या कठिण प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती’.

ममता बॅनर्जी यांनी ट्विट करत लिहिले की, ‘प्रख्यात गायक आणि संगीतकार बप्पी लहरी यांच्या अकाली निधनाबद्दल ऐकून धक्का बसला. आमच्या उत्तर बंगालमधील एक मुलगा, त्याच्या प्रतिभा आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर संपूर्ण भारतात किर्ती मिळवत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचला. संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा आम्हाला अभिमान आहे. पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च राज्य नागरी पुरस्कार ‘बंगविभूषण’ देऊन त्यांचा सन्मान केला होता. त्यांच्या या प्रतिभेची आम्ही नेहमी आठवण ठेवू. त्यांना माझी श्रद्धांजली’.

दरम्यान, बप्पी लहरी यांच्यावर मागील एक महिन्यापासून रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. परंतु, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरी बोलावले होते. पण त्यांच्या प्रकृतीत खूपच बिघाड झाल्याने त्यांना रूग्णालयात हलवरण्यात आले. पण उपचारादरम्यान अखेर मंगळवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

महत्त्वाच्या बातम्या :
सहा एकरची देवराई जळून खाक झाल्यावर सयाजी शिंदेनी हात जोडून केली विनंती, म्हणाले..
संजय राऊतांच्या आरोपांवर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, ‘स्वतःच्या खर्चावर बोट ठेवलं जातं तेव्हा…’
‘तुमचा पठ्ठ्या घोडी धरणार म्हणजे धरणार’, अमोल कोल्हेंनी शब्द पाळला, घोडीवर स्वार झाले आणि..

बाॅलीवुड मनोरंजन

Join WhatsApp

Join Now