Sonali Phogat, Bigg Boss, Sudhir Sangwan, Rinku Dhaka/ टिक-टॉक स्टार आणि ‘बिग बॉस’ फेम सोनाली फोगटने 23 ऑगस्ट 2022 रोजी अखेरचा श्वास घेतला. सोनाली फोगटचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे सुरुवातीला समोर आले होते. रिपोर्ट्सनुसार, ती पार्टीसाठी बाहेर गेली होती. त्याचबरोबर तिच्या मृत्यूबाबतही विविध आरोप केले जात आहेत. सोनाली फोगटच्या मृत्यूप्रकरणी गोवा पोलिसांनी गुरुवारी खुनाचा गुन्हा दाखल केला.
सोनालीचा भाऊ रिंकू ढाका याच्या तक्रारीवरून सोनालीचा पीए सुधीर सांगवान आणि त्याचा साथीदार सुखविंदरला अटक करण्यात आली आहे. 22 ऑगस्टला फोगट गोव्यात पोहोचली तेव्हा सांगवान आणि वासी तिच्यासोबत होते. सोनाली फोगटचा भाऊ रिंकू ढाका याने बुधवारी अंजुना पोलिस ठाण्यात दोघांविरोधात तक्रार दाखल केली होती. आता सोनालीच्या मुलीनेही आईच्या मृत्यूवर मौन तोडले आहे.
सोनाली फोगटची मुलगी यशोधरा हिने आपल्या आईला न्याय मिळावा यासाठी सरकारकडे याचना केली. आईच्या मृत्यूनंतर मावशीकडे राहणारी यशोधरा रडली आणि एका एजन्सीशी बोलताना म्हणाली, ‘माझ्या आईला न्याय मिळायला हवा. या प्रकरणाचा योग्य तपास होणे गरजेचे आहे. दोषींना कठोर शिक्षा झाली पाहिजे’.
सुधीर सांगवानने सोनालीच्या जेवणात काहीतरी मिसळून तिच्यावर बलात्कार केल्याचे रिंकूने पोलिस तक्रारीत म्हटले आहे. हरियाणातील फतेहाबाद जिल्ह्यातील भूतान कलान गावात राहणाऱ्या रिंकूने सुधीरवर सोनालीचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचा आरोपही केला आहे.
सुधीर सांगवान हा जवळपास वर्षभर सोनालीवर बलात्कार करत होता. सोनालीची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने हत्या करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सोनालीविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. सुधीरने गोवा पोलिसांना लेखी तक्रार देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
सोनाली फोगटच्या शरीरावर जखमेच्या खुणा आढळल्या आहेत. शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर खोल जखमांच्या खुणा असल्याचे समोर आल्या आहे. तिच्या शरीराला अनेकवेळा कशाने तरी दुखापत झाल्याचे अहवालात समोर आले आहे.