राज्यात भोंग्यावरुन प्रचंड वाद सुरू आहे. राजकीय वर्तुळात आरोप – प्रत्यारोपांचे सत्र जोरदार सुरू आहे. अशातच गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मंदिरात लाऊडस्पीकरवरुन आरती केल्याच्या कारणावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आली आहे.
या घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गुजरातमधील मंदिरांमध्ये लाऊडस्पीकर वाजवण्यावरून हिंसाचार झाल्याची आठवडाभरातील ही दुसरी वेळ आहे. या प्रकरणी पोलिसांनी घटनेच गांभीर्य लक्षात घेत पाच आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाचा नेमकं घडलं काय..? मंदिरात लाऊडस्पीकर वापरून आरती करत असल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील ही घटना असल्याची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जसवंतजी ठाकोर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी पोलिसांनी जसवंतचा मोठा भाऊ अजितकडून या घडल्या प्रकाराची माहिती घेतली. घटणेबाबत अजितने पोलिसांना सांगितले की, “जशवंत आणि मी आमच्या घराजवळील मेलाडी माता मंदिरात लाऊडस्पीकरवर आरती करत होतो. तेवढ्यात सदाजी येथे आला त्याने “लाऊडस्पीकर इतक्या जोरात का वाजवत आहे,” असे विचारले.
लाऊडस्पीकर जोरात वाजविल्याने सदाजीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली, अशी माहिती अजितने पोलिसांना दिली. त्यानंतर वाद आणखी चिघळला सदाजीने त्याच्या साथीदारांना बोलावले. याबाबत पोलिसांना सांगताना अजितने म्हंटले आहे की, “पाच जणांकडे काठ्या होत्या ज्याने त्यांनी आम्हा दोघांवर हल्ला केला.”
दरम्यान, या घटनेत जसवंत यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे, तर अजितच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी सदाजी ठाकोर, विष्णूजी ठाकोर, बाबूजी ठाकोर, जयंतीजी ठाकोर, जवानजी ठाकोर आणि विनुजी ठाकोर यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
गेल्या पंधरा वर्षात भोंग्याचा त्रास झाला नाही, नेमका भाऊ मुख्यमंत्री झाल्यावरच त्रास का झाला?
“IPS कृष्णप्रकाश यांच्यासाठी 200 कोटींची वसुली?”, लेटर बॉम्बने राजकीय वर्तुळात उडाली खळबळ
‘जय भीम’फेम साऊथ सुपरस्टार सुर्या अडकला कायद्याच्या कचाट्यात; कोर्टाने दिले ‘हे’ आदेश
‘आई..लवकर घरी परत येईन’ असं सांगून गेलेल्या वैष्णवीचा मृतदेहच आला घरी; काळजाचा ठोका चुकवणारी घटना