आपला देश हा कृषिप्रधान देश म्हणून ओळखला जातो. अलीकडे तरुण वर्ग ही मोठ्या प्रमाणत शेतीकडे वळला आहे. पारंपारिक शेतीतून नव्या वाटा शोधण्याचं काम शेतकरी करत आहेत. अभिमानाची बाब म्हणजे यामधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नफा होताना देखील पाहायला मिळत आहे. याचं उदाहरण पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं दिलं आहे.
एकीकडे नैसर्गिक संकटांनी शेतकरी हैराण झालेले असताना या बदलत्या हवामानात एका युवा ढोबली मिरची चे भरघोस उत्पन्न घेतले आहे. शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील विठ्ठल उमाप या युवा शेतकऱ्याने पॉलिहाऊस शेतीतून तब्बल 30 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. संपूर्ण जिल्ह्यात सध्या हा चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे.
आपल्या रोजच्या आहारात वापरण्यात येणाऱ्या शिमला मिरचीने या युवा शेतकऱ्याच नशीबच बदलून टाकले आहे. शिरूर तालुक्यातील जातेगाव येथील उमाप या युवा शेतकऱ्याने पॉलिहाऊस शेतीतून तब्बल 30 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. उमाप यांनी एक एकर पॉलिहाऊस शेतीमध्ये कलर कॅप्सिकम सिमला मिरचीच्या 12 हजार रोपांची लागवड केली आणि या सिमला मिरचीला 70 रुपयांपासून जास्तीत जास्त 250 रुपयापर्यंतचा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे.
दरम्यान, भारतातील पॉलिहाऊस शेती वाढत आहे. पालीहाऊस शेती हे पाश्चात्य देशांमध्ये शेती करण्याचे एक आधुनिक तंत्र आहे. भारतात पारंपारिक शेती एकूण उत्पादनापैकी 95% आहे. याचे कारण असे की भारतातील शेतकरी जमिनीचे वैयक्तिक मालक आहेत आणि बहुतेक बहुतेक बहुतेक जवळपास 2 हेक्टर जमीन शेतीसाठी असतात. उच्च निश्चित किंमत आणि जास्त आवर्ती खर्चामुळे केवळ मोठ्या शेतकरी किंवा कंपन्यांना पॉलिहाऊस शेती करणे परवडते.
याचबरोबर पॉलीहाऊसमध्ये उगवलेल्या भाज्या आणि फुलांमध्ये 90% पाणी असल्याने ते इतर भाजीपाला आणि फुलांच्या बाहेरील उत्पादनापेक्षा गुणवत्तेत जास्त आहे. तथापि, उच्च आर्द्रतेमुळे पॉलीहाऊसमध्ये, अगदी लहान वस्तु, थ्रीप्स आणि बुरशीजन्य संसर्गाची वाढ होण्याची शक्यता असते. हे वाढणारे नियंत्रित वातावरण, कीटक आणि तण कमी करणे, वाढणारा हंगाम वाढविणे, झाडांना कमी पाणी आणि प्रति चौरस फूट जास्तीत जास्त वनस्पती असे फायदे देते.
महत्त्वाच्या बातम्या –
पारंपारिक कोळीगीतांचा बादशाह हरपला, लोकशाहीर काशीराम चिंचय यांचे दु:खद निधन
३० लाख रुपये मिळवण्याची शेतकऱ्यांना सुवर्णसंधी, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम
जेव्हा लता मंगेशकर यांना जीवे मारण्याचा झाला होता प्रयत्न, असा वाचला होता त्यांचा जीव
घटस्फोटानंतर पहिल्यांदाच उघडपणे बोलला नागा चैतन्य, चाहत्यांनाही केले आश्चर्यचकित