Share

प्लांट चीनमध्ये आणि सवलती भारताकडून मागणाऱ्या टेस्लाला मोदी सरकारने शिकवलाय धडा

जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्ला भारतात कारनिर्मितीचा प्लांट उभारणार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. भारतातील लोक देखील केंद्र सरकारकडे याबद्दल विचारणा करू लागले आहेत. आता टेस्ला कार कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी यावरून भारत सरकारवर दबाव आणण्यास सुरवात केली आहे.

टेस्ला ही इलेक्ट्रिक कार जगभरात फार लोकप्रिय आहे. या इलेक्ट्रिक कारला भारतामधून फार मागणी आहे. भारतातील लोक या कारची फार आतुरतेने वाट पाहत आहेत. पण केंद्र सरकारच्या काही धोरणांमुळे ही प्रक्रिया रखडली आहे. या प्रकरणावर टेस्ला कार कंपनीचे मालक एलॉन मस्क यांनी ट्विट केले आहे.

एलॉन मस्क याने भारतीय सरकारच्या आयातीच्या धोरणांवर टीका केली आहे. “भारतातील आयात शुल्क हे जगातील सर्वोच्च आहे आणि हा देश पेट्रोल वाहनांच्या बरोबरीने स्वच्छ ऊर्जा वाहने पाहतो, जे त्यांच्या हवामान उद्दिष्टांशी सुसंगत नाही. कॅलिफोर्नियास्थित कार उत्पादक कंपनीने प्रथम वाहने आयात केली आणि परिस्थितीची पाहणी केली तर भारतात कारखाना सुरू करण्याची अपेक्षा केली जाऊ शकते.

यावर केंद्र सरकारने सांगितले आहे की, टेस्ला कंपनीनं भारतात त्यांच्या वाहनांचं उत्पादन तयार करावं आणि भारतामधून त्या गाड्या इतर देशांत निर्यात कराव्यात, अशी ऑफर केंद्र सरकारने दिली आहे. आयात शुल्कात सवलत देणं हे केंद्र सरकारच्या व्यापार धोरणांच्या विरोधात आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीला विशेष सवलत देता येणार नाही.

‘केंद्र सरकारने एलॉन मस्क यांना विशेष सवलत दिली तर, इतर कंपनींना चुकीचा संदेश जाईल. या गोष्टीचा परिणाम भारताच्या परकीय गुंतवणुकीवर होईल’, असे मत केंद्र सरकारने व्यक्त केले आहे. भारतातील राज्य सरकारांनी मात्र टेस्ला कंपनीला त्यांच्या राज्यात वेगवेगळ्या सवलती देऊ केल्या आहेत. तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र्र या राज्यांनी टेस्ला कार कंपनीचा प्लांट आपल्या राज्यात उभारण्यास ऑफर देऊ केल्या आहेत.

महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी रविवारी टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांना राज्यात इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू करण्याची ऑफर दिली. या ऑफरवर टेस्ला कार कंपनीचे मालक एलॉन मस्क यांच्याकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. टेस्ला कार कंपनीचे उत्पादन सध्या चीनमधून होत आहे.

महत्वाच्या बातम्या :-
लॅपटॉप खरेदी करण्याची सुवर्णसंधी; फ्लिपकार्टवर सुरुय सेल, मिळतोय जबरदस्त डिस्काऊंट
कांद्यामुळे बांधला बंगला, मग बंगल्यावर कांद्याचा पुतळाच उभारला; शेतकऱ्याची राज्यात चर्चा
माझ्यासोबत सेक्स करा आणि मार्क्स मिळवा, प्राध्यापकाची खुली ऑफर ; पोलीसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या बातम्या

Join WhatsApp

Join Now