Pune: मोठी बातमी! पुण्यातील ‘या’ भागात भर लोकवस्तीत विमान कोसळले; विमानाचा चक्काचूर तर पायलट..

Pune | इंदापूर येथून एक विचित्र घटना समोर आली आहे. विमानातील इंधन संपले आणि विमान थेट शेतात कोसळले. इंदापूर येथील एका शेतात हा प्रकार घडला. हे विमान कार्व्हर एव्हिएशनचे होते अशी माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका गंभीर नव्हता पण विमानातील एक वैमानिक जखमी झाला आहे.

त्याला उपचारासाठी नवजीवन हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे. शेळगाव येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भाविका राहुल राठोड असे त्या महिला वैमानिकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार बारामतीतील हे विमान होते. कार्व्हर एव्हिएशनमार्फत येथे पायलट प्रशिक्षण दिलं जातं.

सकाळी या विमानाने उड्डाण केलं होतं. पण अचानक या विमानातील इंधन संपले आणि ही घटना घडली. इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथील बारहाते यांच्या शेतात हे विमान पडले होते. या अपघातात भाविका राहुल राठोड या २२ वर्षीय महिला वैमानिक जखमी झाल्या ज्या तिथे प्रशिक्षण घेत आहेत.

घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी शेजारील गावातील पोंदकुले वस्तीतील तरूण पोहोचले. त्यांनी महिलेला सुरक्षितरित्या बाहेर काढलं. या महिला पायलटला किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी विमानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच बारामती येथून कार्व्हर एव्हिएशनचे अधिकारी आणि कर्मचारीही पोहोचले होते. त्यांचे पथक येथे पाहणी करण्यासाठी आले होते आणि घटना कशी घडली याबाबत माहिती घेण्यासाठी आले होते. दरम्यान, या घटनेने गावात आश्चर्याचं वातावरण होतं.

गावकऱ्यांनी अपघातग्रस्त विमान पाहण्यासाठी गर्दी केली होती. शेतात विमान पडल्याने बारहाते यांनाही विश्वास बसत नव्हता. त्यांना माहिती मिळताच त्यांनी शेताकडे धाव घेतली आणि मदतीसाठी लोकांना गोळा केले. त्यानंतर शेजारील गावातील काही तरूणांनी महिला वैमानिकाला सुरक्षित बाहेर काढलं. दोन वैमानिक त्या विमानात होते पण एका वैमानिकाला काही इजा झाली नाही.

महत्वाच्या बातम्या
शिवसेना..नाते पिढ्यांपिढ्यांचे..; ठाकरेंच्या भाषणावेळी चिमुकल्याच्या जोरदार घोषणा; पहा व्हिडीओ
मोदींच्या रडारावर आता आदित्य ठाकरे; शिवसेनेला बसणार आणखी एक मोठा धक्का?
Saif Ali Khan: सैफ अलीच्या सपोर्टशिवाय तान्हाजी चित्रपट बनलाच नसता, दिग्दर्शक ओम राऊतांचा खुलासा
Himesh Reshammiya: आपल्याच पत्नीच्या मैत्रिणीच्या प्रेमात पडला होता हिमेश रेशमिया, २२ वर्षांचा संसार केला उद्ध्वस्त