अभिनेता सलमान खानबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकताच सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गँगस्टर कपिल पंडित याने सलमान खानला मारण्यासाठी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीने जबरदस्त प्लॅनिंग केले होते, असा खुलासा केला आहे.
सलमान खानच्या पनवेल फार्महाऊसजवळ चार महिन्यांहून अधिक काळ राहून पूर्ण नियोजन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. रक्षकांशी मैत्री, गाडीचा वेग त्याला मारण्यासाठी पिस्तुल वापरण्यापर्यंत पूर्ण प्लॅनिंग चाललं होतं असे त्याने सांगितले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानचे फार्महाऊस असल्याने कपिल पंडित, संतोष जाधव, दीपक मुंडी आणि इतर नेमबाज मुंबईतील वाजे भागात पनवेल येथे भाड्याने खोली घेऊन राहायला आले होते. त्या संपूर्ण वाटेचा फेरफटका मारून त्यांनी ही खोली भाड्याने घेतली होती. बिष्णोई टोळीचे सदस्य जवळपास दीड महिन्यापासून या खोलीत राहत होते, असेही पोलिसांनी सांगितले.
लॉरेन्स बिश्नोई टोळीने हेही नोंदवले होते की, हिट अँड रन प्रकरणात सलमानचे नाव आल्यापासून तो त्याच्या कारचा वेग खूपच कमी ठेवतो. एवढेच नाही तर पनवेल फार्महाऊसकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक खड्डे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे सलमानच्या कारचा वेग ताशी २५ किलोमीटर होईल याचा देखील त्यांनी निरीक्षण करून अंदाज लावला होता.
बिश्नोई टोळीने हे देखील नोटीस केले की, जेव्हाही सलमान खान त्याच्या फार्महाऊसवर येतो तेव्हा त्याचा पीएसओ शेरा त्याच्यासोबत असतो. माहितीनुसार, लॉरेन्स बिश्नोईचे शूटर फार्महाऊसच्या रक्षकांना भेटायचे. सलमान खानचा चाहता म्हणून त्यांनी सुरक्षारक्षकांसमोर आपली ओळख करून दिली.
नंतर हळूहळू रक्षकांशी मैत्री केली. जेणेकरून त्यांना अभिनेत्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती मिळू शकेल. सलमान खानला मारण्यासाठी बिष्णोई गँगच्या सर्व शूटर्सकडे लहान शस्त्रे, पिस्तूल, काडतुसे होती. दरम्यान सलमान खान दोनदा त्याच्या फार्महाऊसवर गेला होता, पण बिष्णोई गँगच्या शूटर्सचा नेम चुकला, अशी माहिती मिळाली आहे.






