Share

‘थेरगाव क्वीन’सोबत डायलॉगबाजी करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या; हात जोडत म्हणाला…

Kunal kamble

इंस्टाग्राम(Instagaram) रील्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी तरुण मुले-मुली कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात. इंस्टाग्रामवर लाईक्स वाढवण्यासाठी उत्साही तरुण काही वेळा नियमांचे उल्लंघन देखील करतात. अशा तरुण मुला-मुलींवर पोलिसांकडून कारवाई देखील केली जाते. असाच काहीसा प्रकार पुण्यातील(Pune) थेरगाव परिसरात घडला आहे.

अश्लील, शिवीगाळ आणि धमकी देणारे व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी याअगोदर साक्षी हेमंत श्रीश्रीमल (१८) आणि साक्षी राकेश कश्यप (१८) यांना अटक करण्यात आली होती. पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या तरुणीचे इंस्टाग्रामवर ‘थेरगाव क्वीन’ या नावाने प्रोफाइल आहे.

तसेच थेरगाव क्वीनबरोबर धमकीचे व्हिडीओ काढणाऱ्या कुणाल कांबळेच्याही (Kunal kamble) पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी अटक करताच आरोपी कुणाला कांबळेला चुकीची उपरती झाली आहे. माफी मागून गयावया करता असल्याचे समोर आले आहे. माफी मागतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

दरम्यान, कुणालने सर्वांची हात जोडून माफी मागितली आहे. “माझ्याकडून व्हिडीओ करताना चूक झाली. खूप मुलींचं मन दुखावलं गेलं. मी सर्वांची माफी मागतो. पुन्हा असे व्हिडीओ करणार नाही. सॉरी,” असा हात जोडून माफी मागत असल्याचा त्याचा हा व्हिडीओ समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘थेरगाव क्वीन’ इंस्टाग्राम प्रोफाइल चालवणाऱ्या तरुणी पिंपरी- चिंचवड शहरात लेडी डॉन म्हणून वावरत होत्या. या तरुणींनी इंस्टाग्राम रिल्समध्ये अश्लील भाषेचा उपयोग केला होता. या तरुणींनी इंस्टाग्राम व्हिडिओमधून खून करण्याची धमकी सुद्धा दिली होती. पोलिसांनी या प्रकरणात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

‘थेरगाव क्वीन’ हीचे इंस्टाग्रामवर हजारो फॉलोवर्स आहेत. या तरुणींचे अनेक इंस्टाग्राम व्हिडिओ यापूर्वी देखील व्हायरल झाले होते. इंस्टाग्राम रील्समध्ये शिव्या देत असल्याने या थेरगाव क्वीनला काही जणांनी सोशल मीडियावर ट्रोल देखील केले होते. इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी या तरुणी अश्लील भाषेचा उपयोग करायच्या.

इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी नियमबाह्य वागणाऱ्या तरुणांना या कारवाईमुळे मोठी चपराक बसली आहे. यापूर्वी देखील दिल्लीतील एका महिलेने आपल्या १२ वर्षाच्या मुलासोबत अश्लील डान्स करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला होता. महिला आयोगाने या प्रकारची दखल घेत पोलिसांकडे त्या महिलेविरोधात तक्रार दाखल केली होती.

महत्त्वाच्या बातम्या
असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, थोडक्यात वाचला जीव; वाचा नेमकं काय घडलं..
भारतीय घराणे जे इतके श्रीमंत होते की इंग्रज आणि बादशाह त्यांच्याकडून घ्यायचे कर्ज, अफाट होती संपत्ती
घाबरले म्हणणाऱ्यांना नितेश राणेंचे जोरदार प्रत्यूत्तर; अटक करणाऱ्यांना पुन्हा दिली थेट धमकी
वडिलांच्या निधनानंतर अभिनेता अजिंक्य देव हळहळला; म्हणाला, त्यांना खुप जगायचं होतं पण..

इतर क्राईम मनोरंजन राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now