Share

shinde group : प्रताप सरनाईक यांच्यावर दफनभूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडपल्याचा आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

Pratap Sarnaik

shinde group : शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक पुन्हा एकदा अडचणीत येणार असल्याचं बोललं जातं आहे. नुकतच सरनाईक यांच्याबद्दल एक वृत्त आलं होतं की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरनाईक यांच्यात वाद झाला. हे प्रकरण ताज असतानाच आता पुन्हा सरनाईक यांच्या अडचणींमद्धे वाढ करणारी बातमी समोर आली आहे.

ठाण्यात दफन भूमीसाठी राखीव असलेला भूखंड हडप केल्याचा आरोप करत ठाणेकरांच्या वतीने सरनाईक यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात सरनाई यांच्याविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च येथील रहिवाशांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या जनहित याचिकेवर येत्या तीन ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.यामुळे पुन्हा एकदा सरनाईक हे वादाच्या भोवऱ्यात सापडणार असल्याचं बोललं जातं आहे.

वाचा नेमकं प्रकरण काय..?
रहिवाशांनी याचिकेत म्हंटलं आहे की,  ठाणे महापालिकेने दोन विकास आराखड्यांत शहरासाठी १० भूखंड राखीव ठेवले होते. मात्र, एकही भूखंड हस्तांतरित केलेला नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे. सरनाईक यांनी बहुमजली इमारत बांधण्यासाठी ठाणे येथे दफनभूमीसाठी राखीव असलेला ३७,००० चौरस मीटर भूखंड हडपल्याप्रकरणी जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी प्रताप सरनाईक यांच्या कंपनीने भूखंड अनारक्षित केल्याची माहिती न्यायालयात उपस्थित केला. तर न्यायालयाने सरनाईक यांच्या कंपनीला प्रतिवादी करण्याची मुभा याचिकाकर्त्यांना दिली आहे. आता पुढील सुनावणी दरम्यान या प्रकरणाचा अधिक खुलासा होईल.

तर दुसरीकडे सरनाईक यांचा ओवळा माजीवाडा मतदारसंघ भाजपच्या माजी आमदाराला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांना कळली. त्यानंतर सरनाईक यांनी शिंदे यांच्याशी संवाद साधल्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली आसल्याची माहिती मिळाली.

महत्वाच्या बातम्या
Sushma Andhare : आमचा दसरा मेळावा गद्दारीविरुद्ध खुद्दारी दाखवणाऱ्या शिवसैनिकांचा असेल; सुषमा अंधारेंचा शिंदे गटाला टोला
raj thackeray : दसरा मेळावा शिवाजीपार्कवर घेण्याच्या भानगडीत पडू नका; राज ठाकरेंनी आधीच दिला होता मुख्यमंत्र्यांना मोलाचा सल्ला
uddhav thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; उद्धव ठाकरेंनी थोपटले दंड अन् मुख्यमंत्री शिंदेंना फुटला घाम
Uddhav Thackeray : दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार, परवानगी न मिळाल्यास बाळासाहेबांची ‘ही’ आयडीया वापरणार उद्धव ठाकरे

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now