Share

uddhav thackeray : ठाकरे कुटुंब अडचणी! ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेविरोधात हायकोर्टात याचिका, वाचा संपूर्ण प्रकरण

aditya udhav thackeray

uddhav thackeray : राज्याच्या राजकारणात ठाकरे कुटुंब आता चांगलच चर्चेत आलं आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यापासून अवघ्या राज्याच लक्ष्य ठाकरे कुटुंबाकडे लागलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या अनेक अडचणींचा सामना करत आहे. असं असतानाच आणखी एक मोठी बातमी ठाकरे कुटुंबातून समोर येतं आहे.

उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी ईडी आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यामुळे आता ठाकरे कुटुंब अडचणीत आलं असल्याचं बोललं जातं आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या जवळचे मानले जाणाऱ्या भिडे परिवाराकडून ही मागणी करण्यात आली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. अवघ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष्य या याचिकेकडे लागलं आहे.

याबाबत बोलताना भिडे यांनी दावा केला आहे की, मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई झाली नाही. त्यामुळे याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, सीबीआय, ईडीसह उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनाही याचिकेत प्रतिवादी करण्यात आले आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, गौरी (३८) आणि अभय भिडे (७८) यांनी ही याचिका दाखल केली आहे. भिडे परिवाराने आणीबाणीच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या साप्ताहिकाची छपाई केली आहे. याबाबत बोलताना गौरी सांगतात की, त्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या तत्वाने प्रेरित आहेत.

या दोघांनी दाखल केलेली ही याचिका संजय गंगापूरवाला आणि आरएम लड्ढा या न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आहे. कोरोना काळात प्रबोधन प्रकाशनचा 42 कोटींचा टर्नओव्हर आणि 11.5 कोटींचा नफा कसा?, त्यामुळे हा पदाचा गैरवापर करत मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आर्थिक घोटाळे करत गोळा केलेला बेहिशोबी पैसा असल्याच याचिकेतून म्हंटल आहे.

इतर ताज्या बातम्या राजकारण राज्य

Join WhatsApp

Join Now