राजस्थानमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका कॉंग्रेस आमदारच्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत विकृत कृत्य (Minor girl sexual molestation) केलं आहे. नराधम आरोपी हा काँग्रेसचा आमदाराचा मुलगा आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
राजस्थानमधील एका काँग्रेस पक्षाच्या आमदाराच्या मुलावर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलवर जिल्ह्यातील राजगड विधानसभेचे आमदार जोहरी लाल मीणा यांचा मुलगा दीपक मीणा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटणेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तर जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय..? हे प्रकरण राजस्थानमधील असल्याचे समोर आले आहे. अलवर जिल्ह्यातील राजगड विधानसभेचे आमदार जोहरी लाल मीणा यांचा मुलगा दीपक मीणा याच्यासह तिघांवर राजस्थानमधील दौसा जिल्ह्यातील मंडावर पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहावीत शिकणाऱ्या 15 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीचं अपहरण रेणी परिसरातून करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. अपहरण करून मंडावर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महुआ मंदावर रोडवर असलेल्या समलेती पॅलेस हॉटेलमध्ये पीडितेला नेलं असल्याची माहिती समोर येत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तिन्ही आरोपींनी पीडितेला अनेकवेळा दबावाखाली या हॉटेलमध्ये आणलंआणि वारंवार सामूहिक बलात्कार केला. मात्र आमदार जोहरीलाल मीणा यांनी आपल्या मुलावरील आरोपांबाबत सांगितलं की, माझी राजकीय प्रतिमा डागाळण्यासाठी खोटे आणि बनावट आरोप केले जात असल्याचे सांगितले.
तर दुसरीकडे पीडितेनं गंभीर आरोप केले आहेत. आरोपीनं पीडितेला धमकावण्यासाठी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडितेनं केल्याने आणखीनच खळबळ उडाली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
पंतप्रधान झाले तेव्हाच मोदींनी दाऊदला भारतात आणायला हवं होतं’, गँगस्टरच्या पत्नीनेच व्यक्त केली खंत
आमिर खानच्या ‘त्या’ मस्करीमुळे तुटले होते ऐश्वर्याचे आणि त्याचे नाते, आजपर्यंत दिसले नाही चित्रपटात एकत्र
शिवसेना नेत्याने मातोश्रीला दिलेल्या २ कोटी रुपयांची यादीच मिळाली; जाधव म्हणाले, मातोश्री म्हणजे माझी आई
मलायका अरोराने सर्वांसमोर खोलली होती अरबाज खानची पोल, वाचून चाहतेही झाले होते हैराण