Share

फटे स्कॅमनंतर आणखी एक घोटाळा उघड, शेतकऱ्यांना घातला सुमारे ४०० कोटींचा गंडा

scam

महाराष्ट्रात सध्या बार्शीतील ‘फटे स्कॅम’ ची चर्चा होत आहे. शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावावर विशाल फटे या तरुणाने कोट्यवधींचा घोटाळा केला आहे. या प्रकरणातील आरोपी विशाल फटे सध्या फरार आहे. या प्रकरणात बार्शीतील बड्या नेत्यांना आणि प्रतिष्ठित व्यक्तींना मोठा फटका बसला आहे. फटे स्कॅम चर्चेत असताना आता मराठवाड्यातील ‘तीस-तीस स्कॅम’ पुढे आला आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद शहरामधून हा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात औरंगाबाद शहर पोलिसांनी सुनील राठोड नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. मात्र हा गुन्हा नंतर फिर्यादीनं मागे घेतला आहे. आता या प्रकरणातील प्रमुख आरोपी संतोष उर्फ सुनील राठोड हा फरार झाला आहे. औरंगाबाद पोलिसांनी सुनील राठोडचे घर सील केले आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या लोकांनी पुढे येऊन तक्रार देण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

२०१६ मध्ये औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील शेतकऱ्यांना एका तरुणाने दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरसाठी लागणाऱ्या जमिनीतून लाखो रुपये मिळवून देण्याचे अमिष दाखवले. या घोटाळ्यासाठी औरंगाबादजवळील बिडकीन आणि त्या परिसरातील गावांना केंद्रबिंदू बनवण्यात आलं. या तरुणाने शेतकऱ्यांना सुरवातीला ५ टक्के परतावा दिला.

त्यानंतर त्या तरुणाने शेतकऱ्यांना २५ टक्क्यांनी परतावा देण्यास सुरवात केली. यासाठी तरुणाने त्याच्या नातेवाइकांचा उपयोग केला. त्याने नातेवाईकांच्या साह्याने तीस-तीस’ नावाचा ग्रुप बनवला. मग हा तरुण आलिशान गाड्या घेऊन शेतकऱ्यांकडे येऊ लागला. शेतकऱ्यांना परतावा देण्यासाठी हा तरुण थेट गोण्यातून पैसे आणू लागला.

हळूहळू या तरुणाने आसपासच्या गावांमध्ये या स्कीमची मार्केटिंग करण्यास सुरवात केली. पुढे या तरुणाने सुमारे ३० गावातील शेतकऱ्यांना आपल्या जाळ्यात ओढले. शेतकऱ्यांना मिळणारा परतावा बघून काही राजकीय नेत्यांनी देखील या स्कीममध्ये गुंतवणूक केली. लोकांनी कोट्यवधी रुपये अधिकचे व्याज मिळेल या उद्देशाने या स्कीममध्ये गुंतवले. पण आता त्यांना मोठा धक्का बसला आहे.

गेली १० महिने या शेतकऱ्यांना व्याज तर सोडा मुद्दल देखील मिळाली नाही. या स्कीममुळे औरंगाबाद भागातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत. शेतकऱ्यांनी पुढे येऊन या प्रकरणाची तक्रार करावी, अशी मागणी पोलिसांनी केली आहे. या प्रकरणातील प्रमुख आरोपी संतोष उर्फ सुनील राठोडचा पोलीस शोध घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या :-
‘’घराणेशाहीला विरोध करता करता भाजपात कधी घराणेशाही घुसली भाजपाला समजलच नाही?’’
क्रिप्टोबाजार हादरला! १००० रुपयांचे झाले ३००० कोटी, एकता क्रिप्टोकरन्सीची कमाल
पशुसंवर्धन विभागाची जबरदस्त योजना! ‘या’ व्यवसायासाठी मिळणार ५० लाखांचे अनुदान; वाचा कसा घ्यायचा लाभ

राज्य

Join WhatsApp

Join Now