मन्नतमध्ये जोरदार जल्लोषाची तयारी सुरू आहे. शाहरुख खान आनंदाने भारावून गेला असेल. गोष्टच तशी आहे की, ज्यामुळे त्याला मुलाचा अभिमान वाटत आहे. शाहरुखचा धाकटा मुलगा अबराम याने शाळेचा ताइक्वांडो सामना जिंकला आहे. हे पाहून शाहरुखच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने स्टेजवरच मुलाला मिठी मारली आणि प्रेमाने चुंबन घेतले. Shah Rukh Khan, Gold Medal, AbRam Khan, Taekwondo,PHOTO
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान हा लोकांच्या मनावर तर राज्य करतोच, पण आता त्याच्या धाकट्या मुलानेही सर्वांच्या मनात घर करण्याचे कौशल्य आत्मसात केल्याचे दिसून येत आहे. शाळेत ताइक्वांडोचा सामना जिंकून अबरामने वडिलांना खूप आनंदी केल आहे. अलीकडेच शाहरुख खान त्याची पत्नी गौरी खान आणि मुले आर्यन-सुहानासोबत मुंबईतील ताइक्वांडो ट्रेनिंग अकादमीमध्ये एका स्पर्धेत दिसला होता.
त्याचवेळी करीना कपूर आणि सैफ अली खान देखील त्यांचा मुलगा तैमूरसोबत स्पॉट झाले होते. या स्पर्धेत अबराम, तैमूरसह करिश्मा कपूरचा मुलगा कियानने भाग घेतला होता. अभिनेता शाहरुख खानला त्याच्या मुलाचा अभिमान वाटत आहे. ही स्पर्धा जिंकून अबरामने सुवर्णपदक पटकावले आहे. आपल्या मुलाच्या विजयाने शाहरुख इतका खूश झाला की त्याने स्टेजवरच अबरामवर प्रेमाचा वर्षाव केला. त्याने अबरामला मिठी मारली आणि प्रेमाने चुंबन घेतले.
यावेळी गौरी खान, आर्यन खान आणि सुहाना खान यांनी टाळ्या वाजवून अबरामचे खूप कौतुक केले. पापा शाहरुख यांच्या हस्ते अबरामला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. त्याचवेळी करीनाचा मुलगा तैमूर आणि करिश्माचा मुलगा कियानचा निकाल काय लागला, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र सर्वांनीच अबरामचे मनापासून अभिनंदन केले.
स्पर्धेदरम्यान शाहरुख वाईन टी-शर्ट आणि काळ्या पँटमध्ये दिसला. यासोबतच त्याने गोल्डन स्नीकर आणि ब्लॅक कॅपही घातली होती. गौरी खान आणि सुहाना निळ्या जीन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसल्या, तर आर्यनने या सगळ्यांमधून ब्लॅक लुक निवडला होता. या स्पर्धेत शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीही उपस्थित होती.
करीना कपूर आणि सैफ अली खानबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री पूर्णपणे डेनिम लूकमध्ये होती. तर दुसरीकडे सैफ अली खान करिनासोबत डेनिम लूक मॅच करताना दिसला. सरतेशेवटी, सर्वांनी एकत्र येऊन स्पर्धेत भाग घेतलेल्या लोकांसोबत फोटो काढले. अबरामला ताइक्वांडो शिकवणाऱ्या प्रशिक्षकाने हे कौशल्य सुहाना आणि आर्यनलाही शिकवले होते.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, शाहरुख खान लवकरच मोठ्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. त्याचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. लोक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. याशिवाय त्यांचे आणखी दोन चित्रपट जवान आणि डंकी देखील पुढील वर्षी प्रदर्शित होणार आहेत. तिन्ही चित्रपटांबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे.
महत्वाच्या बातम्या-
PHOTO: ‘या’ पुस्तकांच्या ढिगाऱ्यामध्ये शोधून दाखवा पेन्सिल, फक्त १% जीनिअसच देऊ शकतात योग्य उत्तर
PHOTO: ‘या’ दगडांमध्ये लपलेली आहे एक मुलगी, फक्त १३ सेकंदात शोधून दाखवा, भलेभले झालेत फेल
PHOTO: कतरिनाने विकीसोबत साजरा केला पहिला करवा चौथ, लाल रंगाच्या साडीत दिसत होती खुपच सुंदर