Neeraj Pandey, Mahendra Singh Dhoni, Priyanka Jha, Girlfriend/ दिग्दर्शक नीरज पांडे (Neeraj Pandey) यांनी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीवर ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ नावाचा चित्रपट बनवला आहे. धोनीच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींचा चित्रपटात उल्लेख करण्यात आला होता. अशीच एक गोष्ट म्हणजे धोनीची आधीची गर्लफ्रेंड प्रियांका झा (Priyanka Jha).
धोनीची प्रियंका नावाची एक गर्लफ्रेंड होती हे चित्रपट रिलीज होण्यापूर्वी फार कमी लोकांना माहीत होते. चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांना कळले की, धोनीच्या परदेश दौऱ्यात प्रियांकाचा अपघाती मृत्यू झाला. बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीने ‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.
चित्रपट पाहिल्यानंतर दिशाच्या सुंदरतेचे आणि साधेपणाचे लोक वेडे झाले, पण धोनीची रिअल लाईफ गर्लफ्रेंड प्रियांका झा हिला पाहण्याची इच्छाही लोकांच्या मनात जागृत झाली. आज आम्ही तुम्हाला धोनीची रियल लाइफ गर्लफ्रेंड प्रियांका झा हिची ओळख करून देत आहोत कारण प्रियांकाचा फोटो पहिल्यांदाच समोर आला आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एमएस धोनीच्या जीवनावर बनलेल्या चित्रपटाने १०० कोटींहून अधिक कमाई केली होती. या चित्रपटात कियारा अडवाणीने धोनीची पत्नी साक्षीची भूमिका साकारली होती. धोनीसोबत रिलेशनशिपमध्ये होते असा डावा करणारी लक्ष्मी रायही धोनीच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहे. यामध्ये ती तिच्या आणि धोनीच्या रिअल लाईफ रोमान्सबद्दल दाखवणार आहे.
खऱ्या आयुष्यात प्रियंका झाचा कार अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. जेव्हा धोनी त्याच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर दीर्घ सुट्टीसाठी गेला होता. त्यादरम्यान, प्रियांकाचा कार अपघातात मृत्यू झाला, ज्याचा धोनीच्या आयुष्यावर खोल परिणाम झाला. तो क्रिकेटमध्ये लक्ष केंद्रित करू शकला नाही, पण कालांतराने त्याने ही भावना आपली कमजोरी बनू दिली नाही.
‘एमएस धोनी – द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटामध्ये धोनीच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. धोनीचे लाखो चाहते आजही आपल्याला पाहायला मिळत आहे. धोनीने आपल्या करियर मध्ये अनेक विक्रम केले आहे. धोनीने साक्षी सिंगसोबत लग्न केले आहे. तसेच त्यांना एक मुलगीही आहे.
महत्वाच्या बातम्या-
धोनीला बारावीत पडले होते एवढे टक्के, तर कोहलीने दहावीनंतर शाळेचं तोंडपण पाहिलं नाही
धोनीच्या अशा ८ सवयी ज्या सर्वांनी आत्मसात केल्या पाहिजेत, आयुष्यात होईल मोठा बदल
रांचीमध्ये आलिशान फार्महाऊस, खासगी जेट; धोनीकडे आहेत या ५ महागड्या वस्तू, वाचून अवाक व्हाल
साक्षीच्या आधी या साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता धोनी, अफेअरनंतर झाली होती बदनामी