प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली आपल्याला पाहायला मिळते. आपले आकर्षक फोटो आणि व्हिडिओ ती सतत सोशल मीडियावर पोस्ट करते.नुसरत तिच्या बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते.
नुकतेच नुसरातने मोहक अंदाजातील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यामध्ये तिने काळ्या रंगाच्या क्रॉप टॉपवर निळ्या रंगाची जीन्स घातली आहे. त्याचबरोबर तिने तिचे केस मोकळे सोडले आहेत. त्यामुळे तिच्या फोटोंवर चाहत्यांच्या नजर खिळल्या आहेत.
तिचे हे फोटोशूटमधील सौंदर्य चाहत्यांना आवडले आहे. त्यांनी फोटोवर लाईक, शेअर आणि कंमेंटचा वर्षाव केला आहे. दोन दिवसांपुर्वी तिने साडीतले अतिशय सुंदर फोटो शेअर केले होते.नुसरत एका मुलाची आई असूनही तिने फिटनेस राखला आहे. या फोटोमध्ये तिचा अप्रतिम फिटनेस पाहायला मिळत आहे. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत आहे.
नुसरत ही नेहमीच तिच्या कामांमुळे तर कधी वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. जेवढी ती पश्चिम बंगालमध्ये अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे तेवढीच ती राजकीय व्यक्ती म्हणूनही प्रसिद्ध आहे.अभिनयासोबत त्यांनी आपले राजकारणात खूप नाव कमवले. फिल्मी जगात छाप पाडल्यानंतर नुसरत लोकसभेवर निवडून आली.
तृणमूल काँग्रेसने तिला बशीरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीत उतरवले होते.तिने भाजप उमेदवार शांतनू बासू यांचा तब्ब्ल साडेतीन लाखांच्या मतांनी लोकसभा निवडणुकीत पराभव केला होता. नुसरत जहाँ बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या खूप जवळच्या व्यक्तींपैकी एक समजली जाते.
बंगाली चित्रपटाची पार्शवभूमी असलेली नुसरत राजकारणात पाऊल ठेवल्यापासून सतत चर्चेत आहेत. लग्नापासून ते मूल होण्याच्या वादाने त्यांची पाठ सोडली नाही. पहिले लग्न तुटल्यापासून त्यांनी पुन्हा एकदा २०१९ मध्ये प्रसिद्ध उद्योजक निखिल जैन यांच्याशी लग्न केले. त्यानंतर हे लग्नच वादात अडकले.






