काही दिवसांपूर्वीच साऊथ चित्रपट ‘पुष्पा द राइज’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले आहे. तसेच या मधील गाणे देखील सुपरहिट झाले आहेत. तसेच या चित्रपटात अभिनेता अल्लू अर्जुन, अभिनेत्री रश्मिका मंधना हे मुख्य भूमिकेत होते. तर अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू ‘ओ अंतवा’ हे आयटम साँग केले. या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
मागील काही दिवसांपासून साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू नेहमी चर्चेत आहे. तिच्या व्यवसायिक जीवनव्यतिरिक्त ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. काही महिन्यांपूर्वीच सामंथाने पती नागा चैतन्यसोबत घटस्फोट घेतला. तेव्हा पासून तिच्या प्रत्येक गोष्टींकडे चाहत्यांचे लक्ष असते. प्रत्येक ठिकाणी तिला फॉलो करतात.
इतकेच नव्हे तर तिची प्रत्येक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. तसेच सध्या सामंथा खूप प्रवास करत आहे. विविध ठिकाणी जाणून ती भेटी देत आहे. इतकेच नव्हे तर ती तिच्या चाहत्यांसोबत हे खास क्षण देखील शेअर करत आहे. याच दरम्यान, सामंथाने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो तिच्या एका खास व्यक्तीसोबतचा आहे. ज्यामुळे सध्या चर्चेला उधाण आले आहे.
ही व्यक्ती सामंथाच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती आहे. आपल्या सर्वांना माहितीच आहे की, साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा ही समंथासाठी खूप स्पेशल आहे. या दोघी एकमेकींच्या बेस्ट फ्रेंड आहेत. तसेच सध्या सामंथाने जो फोटो शेअर केला आहे. तो देखील नयनताराचाच आहे. या फोटोमध्ये दोघी मैत्रिणी खूप आनंदी दिसत आहेत.
तसेच या फोटोमध्ये नयनताराने सामंथाला मिठी मारली आहे. दोघांही आनंदाने पुढे चालताना ही दिसत आहेत. हा फोटो पोस्ट सामंथा कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘#नयनतारा माझ्या खास मैत्रीसाठी. तिचं सोशल मीडियावर अकाऊंट नाही, तिने तुम्हाला प्रेम पाठवलं आहे.’
सामंथाच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार आले. मात्र तिने या सर्व गोष्टी मागे सोडून आपल्या करिअरकडे लक्ष दिले. तसेच तिची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आता पुष्पा या चित्रपटानंतर ती ‘शकुंतलम’ या चित्रपटात दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील तिचा पहिला लूकही समोर आला आहे.