चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप ही नेहमी सोशल मिडीयावर सक्रीय असते. ती तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे कायम फोटो व्हिडीओ शेअर करीत असते. नुकतेच तिने बॉयफ्रेंडसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
शेन ग्रेगोयर असे आलियाच्या बॉयफ्रेंड नाव आहे. तिने त्याच्यासोबतचे कारमधील किस करत असतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आलियाचे इन्स्टाग्रामवर खूप चाहते आहेत. त्यामुळे त्यांचे हे फोटो इन्स्टाग्रामवर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत.
जरी ती बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शकाची मुलगी असली तरी तिला अभिनय क्षेत्रात करीयर करायचे नाही. आलिया एक प्रसिद्ध युट्युवबर आहे. त्याचबरोबर तिचा इन्स्टाग्रामवर प्रचंड चाहता वर्ग आहे. काही दिवसांपूर्वी ती तिच्या बॉयफ्रेंडसोबत गोव्यात सुट्टीसाठी गेली होती. त्यावेळीही तिने काही फोटो शेअर केले होते.
केवळ इन्स्टाग्रामवरवरच नाहीतर तर तिने युट्युब चॅनेलवरही बॉयफ्रेंडसोबतचे व्हिडीओ शेअर करत असते. त्यावर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यावर उघडपणे बोलत असते. त्याचबरोबर ती तिचे खासगी फोटोही शेअर करत असते. नुकतेच या दोघांच्या नात्याला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिम्मित शुभेच्छा देत असताना तिने हा फोटो शेअर केला आहे.
हा फोटो शेअर करत असताना तिने एक छान कॅप्शन दिले आहे. ‘ माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट दोन वर्षे माझा जिवलग मित्र, माझा सोलमेट सोबत घालवली. कायम तुझ्यावर असेच प्रेम करीत राहीन’, असे कॅप्शन तिने दिले आहे. त्याचबरोबर शेननेही हाच फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे.
‘माझ्या स्वीट एन्जेलला रिलेशनशिपचे दोन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. माझ प्रेम माझी बेस्टफ्रेंड, माझी पार्टनर आणि माझं सगळ काही, तू माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण घेऊन आली. मला समजून घेतलं त्याबद्दल मी तुझा खूप आभारी आहे. ज्या दिवशी मी तुझ्या हातात अंगठी घालेन त्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत आहे,असे कॅप्शन देत त्याने फोटो पोस्ट केला आहे. त्याच्या या कॅप्शननंतर आलिया आणि शेनच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले आहे.