सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक गाड्यांचा चांगला पर्याय आपल्यापुढे आहे. हळूहळू या गाड्या रोडवर वाढतच चालल्या आहेत. याचा पर्यावरणाला आणि आपल्यालाही भरपूर फायदा असतो. सुरुवातीला या गाड्यांच्या किंमती जास्त असल्यामुळे कित्येक लोक इच्छा असूनही ती घेऊ शकत नाहीत.
असे असताना तुमच्यासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता तुमच्या दुचाकीलाच इलेक्ट्रिक बाईकमध्ये कन्व्हर्ट करता येणं शक्य होणार आहे. यामुळे आता गाड्या फिरवायला परवडणार आहेत. यामध्ये आता GoGoA1 कंपनीने यासाठी एक खास प्रकारचे ईलेक्ट्रिक वाहन कन्व्हर्जन किट लाँच केले आहे.
हे किट अगदी स्वस्त असून, ते सर्वांना परवडत आहे. तसेच आरटीओने देखील याला परवानगी दिली आहे. त्यामुळे तुम्ही आता कायदेशीररित्या आपली पेट्रोलची दुचाकी इलेक्ट्रिक बनवू शकता. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. सध्या हे किट 50 हून अधिक दुचाकींना सपोर्ट करत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
दरम्यान, हीरो, हीरो-होंडा आणि होंडाच्या गाड्यांचा तसेच स्कूटरच्या गाड्यांना हे किट चालत आहे. अॅक्टिव्हा स्कूटरच्या पाच व्हेरियंटचा देखील यात समावेश आहे. यामुळे हे एक फायदेशीर किट आहे.
होंडा अॅक्टिव्हा स्कूटरच्या कन्व्हर्जन किटची किंमत 19 हजार रुपये आहे. याशिवाय 1.6 kWh LFP बॅटरीसाठी अतिरिक्त किंमत 30 हजार रुपये आहे. ही बॅटरी 60 किलोमीटरची रेंज देते. यामुळे लोकलला हे किट फायदेशीर आहे.
यामध्ये बॅटरीच्या इनबिल्ट IoT साठी 5 हजार रुपये आणि चार्जरसाठी 6,500 रुपये मोजावे लागणार आहेत. बाईकच्या कन्व्हर्जन किटची किंमत 29,999 रुपये आहे. बॅटरी आणि IoT साठी स्कूटरप्रमाणेच किंमत असणार आहे.
तसेच आरटीओ डॉक्युमेंटेशन यासाठी अतिरिक्त 5 हजार रुपयांचा खर्च असणार आहे. यामुळे आता हा एक चांगला पर्याय आपल्यापुढे असणार आहे. यामुळे तुमचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे.